श्रीवर्धन मतदार संघात तटकरे विरुद्ध तटकरे लढतीत विजय सुनिल तटकरेंचाच होणार


( म्हसळा प्रतिनिधी)
श्रीवर्धन मतदार संघाचे माजी आमदार अवधूत तटकरे यानी आज सोमवारी सायंकाळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.अवधूत तटकरे यांच्या समवेत माजीआ.अनिल तटकरे, राजिप माजी सभापती शुभदा तटकरे, संदीप तटकरे, पत्नी रेवती तटकरे व काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोडून श्रीवर्धन मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव व रोहा परीसरांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालीका, नगरपंचायत, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यानी प्रवेश केला नसल्याने शिवसेनेपुढे ऊमेदवार कोण हा राजकीय दृष्टा प्रश्नचिन्ह आसल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.या उलट जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख बदलाने मतदार संघातील तळा,म्हसळा या तालुक्यातील व मतदार संघातील शिवसेनेचा नाराज गट खासदार तटकरेंच्या संर्पकात आसल्याचे शिवसेनेच्या गोटातील चर्चा आहे. श्रीवर्धनचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून असलेले माजी आमदार अवधूत तटकरे यानी मागील चार ते साडेचार वर्षात मतदार संघातील मतदारांजवळ राजकीय अथवा लोकप्रतिनिधी म्हणून संर्पक न ठेवणे,प्रशासकीय कामकाजात दुर्लक्ष ,मतदार संघातील श्रीवर्धन,म्हसळा,तळा या तालुक्यांतून आमसभा न घेणे,मत देणाऱ्या व न देणाऱ्या मतदाराना वाऱ्यावर सोडणे या प्रकारामुळे अवधूत तटकरे ना पुन्हा मत "नको रे बाप्पा" या निर्णयावर मतदार संघातील मतदार ठाम आहे. अवधुत तटकरे अगर पत्नी रेवती तटकरे याना उमेदवारी दिली तरी पुन्हा एकदा रोहा नगरपालीकेची पुनरावृत्ती होण्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

श्रीवर्धन मतदारसंघ हा युतीच्या माध्यमातून शिवसेने कडे आहे.युतीतून शिवसेनेचा उमेदवार निश्चित नसला तरी रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विद्यमान जिल्हाप्रमुख अनिल नवगणे व आता अवधूत तटकरे असे संभाव्य उमेदवार आसल्याची चर्चा असताना, मतदार संघावर राजकीय दृष्टीकोनातून प्रभृत्व असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांचे नाव जवळ जवळ निश्चित आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे खासदार सुनील तटकरे यांचे प्रगल्भ नेतृत्व, अनिकेत तटकरे यांचेकडे असणारे विधान परिषदेचे सदस्य पद, अदीती तटकरे यांचे कडे असणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद , मतदारसंघातील म्हसळा, तळा, माणगाव व रोहा या पंचायत समीती, रोहा व श्रीवर्धन नगरपालिका, म्हसळा , माणगाव नगरपंचायती व मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायती या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आसल्याने मतदार संघातील सततचा संर्पक ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जमेच्या बाजू ह्यांचा राजकीय दृष्टीकोनातून पक्षाला फायदाच होणार आहे. 
दुसऱ्या बाजूने वंचीत बहुजन आघाडीने मतदार संघात उमेदवार दिल्यास मतदार संघातील मुस्लीम मतदार कोणा कडेल झुकेल यावर भवितव्य आहे.
शिवसेनेची उमेदवारी अवधूत तटकरे किंवा रेवती तटकरे 
याना मिळाल्यास विरुध्द राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे अशी लढत झाल्यास श्रीवर्धनचा मतदार आपला कौल खासदार सुनील तटकरे यांच्या १० वर्षाचे सेवेलाच देईल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा