स्वराज्य प्रतिष्ठान रायगड हि संस्था भविष्यात तरुणांचे आशा स्थान असेल : कृष्णा कोबनाक


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संस्थेचा ६वा वर्धापन नुकताच सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे प्रमुख कृष्णा कोबनाक ह्यानी मनोगतात स्वराज्य प्रतिष्ठान रायगड हि संस्था भास्कर कारे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात जिल्हयातील तरुणांचे आशा स्थान असेल असे कौतुकाने सांगितले. संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रिडा क्षेत्रात करीत आसलेल्या कामातून ही मंडळी युवकांची श्रृंखला करीत आहे असे सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भास्कर कारे , जयसींग बेटकर, महेश जाधव मार्गदर्शन केले. यावेळी सचिन करडे, सपना खांडेकर, प्रसन्न निजामपूरकर, अनंत अंबवले, गणेशदादा बोर्ले, सिताराम राठोड, विनय सोनावणे, तुषार काप, गणेश डांगे, वैशाली डांगे, दिलीप कोबनाक ,सेजल घडशी आदी उपस्थित होते. यावेळी माता जिजाऊ वर प्रबोधन करणाऱ्या सपना खांडेकर यांचा कृष्णा कोबनाक,भास्कर कारे कमान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला,प्रमुख वक्ते रोशन पाटील यांनी शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या विषयी मार्गदर्शन करताना तरूणानी राजकीय क्षेत्रांत सहभाग आवश्य घ्यावा, इतिहास समाजाला शहाण बनविनारे महत्वाचे साधन आहे.यांच्या स्वराज्य बाबतीत इतिहास युवकांनी समजून समाज कार्य करावे, गुलामीत काम न करता कोणाकडे हात न पसरता स्वराज्य उभे करा, जय जिजाऊ जय शिवराय चा उद्घोषणा सर्व मावळे यांनी दिली .या वेळी उपस्थित तरुणानी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा