राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक भाऊ करडे यांचा शिवसेनेत प्रवेश ; म्हसळा शिवसेनेकडून जंगी स्वागत


म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक बाळ (भाऊ) करडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.भाऊ करडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने म्हसळा शिवसेनेकडून मध्यवर्ती कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र लाड, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, उपतालुका प्रमुख अनंत कांबळे, गजानन शिंदे, पांडुरंग बने, बाळा म्हात्रे, अमित महामुनकर, अनंत नाक्ती, संतोष सुर्वे, हेमंत नाक्ती, अनिल महामुनकर, कल्पेश जैन आणी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. ज्यांनी  म्हसळा तालुक्यात शिवसेना स्थापनेसाठी  संघर्ष केला शिवसेना वाढीला नेली अशे बाळ करडे पुन्हा शिवसेनेत आल्याने शिवसेनेत उभारी आली आहे. असे वक्तव्य माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी यावेळी केले.तर बाळ करडे परत शिवसेनेत आल्याने जुना साथीदार मिळाला त्यामुळे पुन्हा जोमाने काम करू आणी श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचा आमदार निवडून आणू अशी आशा माजी सभापती रवींद्र लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.तसेच आगामी काळात म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीला अजून झटके देणार असून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती तालुका प्रमुख महादेव पाटील यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा