म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
शिवसेनेचे महाड - पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या डोंगरोली गवळवाडी गावातील मंदिरासमोरील पटांगणात सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता आणि संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख श्री.अनिल नवगणे यांच्या शुभहस्ते व शिवसेना प्रणित गवळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उद्घाटन प्रसंगी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, म्हसळा तालुक्यातील शिवसेना प्रणित गवळी समाज संघटना संस्थापक अध्यक्ष रविंद्र लाड, कार्याध्यक्ष गणेश वाजे, युवासेना उपविभाग अधिकारी मांजरोने विभाग अविनाश वरणकर, शाखा क्र.51 उपविभाग अधिकारी सुदेश खेडेकर, शिवसेना उपशाखाप्रमुख रमेश खेडेकर, युवासेना शाखाधिकारी डोंगरोली मिलिंद खेडेकर, अध्यक्ष डोंगरोली सिताराम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष मी मराठी प्रतिष्ठाण रायगड आदेश लाड यांसह सर्व डोंगरोली गवळवाडी गावातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून गावागावात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येतील असे सांगून ग्रामस्थांनी आगामी काळात शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आव्हाहन केले. गावात विकास कामे केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले.

إرسال تعليق