श्रीवर्धन मतदारसंघात एमआयएम उमेमद्वार देण्याच्या तयारीत

एमआयएमचे कोकण प्रभारी अक्रम खान व एमआयएमचे पनवेल तालुका अध्यक्ष असिम पटेल यांचे म्हसळयात स्वागत करताना खरगाव बुद्रुक चे उप सरपंच अकमल कादरी, असलम कादरी, मंसूर दरोगे, सर्फराज वस्ता दिसत आहेत.

श्रीवर्धन मतदारसंघात एमआयएम उमेमद्वार देण्याच्या तयारीत,एमआयएमचे कोकण प्रभारी अक्रम खान यांची म्हसळ्यात धावती भेट:मतदार संघातील राष्ट्रवादीचे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

म्हसळा (निकेश कोकचा)
वंचित बहुजन सोबत आघाडी तोडल्यानंतर एमआयएमने अपेक्षित काही मतदार संघातून उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली असून यामध्ये श्रीवर्धन मतदार संघाचा देखील समावेश आहे. एमआयएमचे कोकण प्रभारी अक्रम खान यांनी शनिवारी म्हसळा शहरातील कार्यकर्त्यांना धावती भेट दिली.या भेटी मध्ये तालुक्यातील एका युवा उप सरपंचाने उमेदवारी मागितली असल्याचे समजते.
श्रीवर्धन मतदार संघामध्ये विजयासाठी मुस्लिम समाजातील मतदार महत्वाची भूमिका बजावतात.सध्या या मतदार संघातील बहुतांश मुस्लिम समाज खा.सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी सोबत आहे. एमआयएमचे कोकण प्रभारी अक्रम खान यांनी तालुक्यातील खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान उप सरपंच अकमल कदरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.या भेटी मध्ये कादरी यांनी आपण श्रीवर्धन मतदार संघातून एमआयएम पार्टी तर्फे आमदारकी लढवणसाठी इच्छुक असल्याचे संगितले.अकमल कादरी राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक म्हणून सध्या तालुक्यात प्रसिद्ध आहेत.कदरी यांनी श्रीवर्धन मतदार संघातील काही प्रमुख मुस्लिम समाज बांधवांना एकत्रित करून राष्ट्रवादीने देखील मुस्लिम समाजातील उमेदवार दिला तर आपण त्या उमेदवारला पाठिंबा देऊ असे जाहीर केले होते.मात्र या मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा अदिति तटकरे यांचे नाव निश्चित झाले आहे, मात्र या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.विधानसभा निवडणुक पूर्वीच श्रीवर्धन मतदार संघातील राष्ट्रवादीचे आ.अवधूत तटकरे यांचा शिवसेना प्रवेश केला आहे.आ.अवधूत तटकरे यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे हा मतदारसंघ कोंग्रेस(आय) पक्षाला सोडवा नाहीतर येत्या निवडणुकीत बंड करून राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात काम करण्याची घोषणा पाच तालुक्याच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी केली आहे. आता याच मतदार संघात एमआयएम पार्टीतर्फे उमेदवारीची चाचपणी करणे म्हणजे या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असल्याचे भाकीत जानकारांनी वर्तवले आहे.


श्रीवर्धन मतदार संघात सध्या मुस्लिम मतांचा वापर राजकीय हेतूने होत आहे.स्व.बँ.एआर अंतुले यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदार संघातून एखादा मुस्लिम उमेदवार विजयी व्हावा हेच स्वप्न आहे.लवकरच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इमतियाज जलील यांची भेट घेणार आहे. -अकमल कादरी,उप सरपंच खरगाव बुद्रुक ग्रामपंचायत
 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा