तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करणार - खासदार सुनिल तटकरे

म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करणार - खासदार सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयात म्हसळा वासीयांचा सिंहाचा वाटा असून मतांच्या रूपाने माझ्यावर असलेले ऋण हे कधीही न फेडण्यासारखे असल्याचे सांगून खासदार सुनिल तटकरे यांनी सांगताना केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक समाजाचे सर्वांगीण विकासासाठी नवीन कार्यक्रमाअंतर्गत देशातील 850 तालुक्यातील 125 तालुक्यांची अल्पसंख्याक मायनॉरटी म्हणुन नोंद झाली आहे. यामधे रत्नागिरीतील फक्त मंडणगड तालुक्याची नोंद आहे. रायगड जिल्ह्यातील एकाही तालुक्याची यात नोंद नाही आता मी माझ्या प्रयत्नाने श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याना या विकास यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. येथील लोकसंख्येच्या तुलनेत या दोन तालुक्यात मुस्लिम, नवबौद्ध, जैन आदि मिळुन 25% जनता अल्पसंख्याक समाजात समाविष्ट असल्याने म्हसळा आणि श्रीवर्धन तालुके केंद्र सरकारच्या नवीन विकास कार्यक्रमात समाविष्ठ करून घेण्यासाठी मी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. आता आगामी 5 वर्षाचे कार्यकाळात सुमारे 50 ते 100 कोटी रुपयांचा विकास निधी अल्पसंख्याक गावातील सर्वांगीण विकासासाठी आणता येईल असे मनोगत खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहरातील सुमारे एक कोटी रुपयांची मंजुर व बांधकाम केलेल्या कामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले. म्हसळा बौद्धवाडी व अंजुमन हायस्कूलमध्ये संपन्न कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की देशातील 125 तालुक्यात श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांची नोंद करण्यासाठी मी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी, संबंधित खात्याचे सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केल्याचे आणि पूर्तता कामी केलेला पत्रव्यवहार अंजुमन हायसकूलच्या संचालक मंडळाकडे सादर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे, प्रदेश सरचिटणीस अलिशेट कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हसवारे, जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक इनामदार, सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले, सदस्य मधुकर गायकर, मा.जिप सदस्या वैशाली सावंत,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,व्यंकटेश सावंत,अंजुमन स्कूल संचालक फझल हलदे,नासिर मिठागरे,मुस्लिम समाज अध्यक्ष मोहमद पेनकर,नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक,उपनगराध्यक्ष संजय कर्णिक,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,नासिर दळवी,शाहिद उकये,शहराध्यक्ष रियाज घराडे,भाई बोरकर,बाबजान पठाण,नईम दळवी,चंद्रकांत कापरे,नगरसेवक करण गायकवाड,संतोष काते,संजय दिवेकर,सतीश शिगवण, संतोष सावंत,अनिल बसवत,सुरेश जाधव आदि मान्यवर ग्रामस्थ,शिक्षक,विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी खासदार तटकरे यांनी त्यांचे विकास निधीतुन मंजुर झालेल्या अंजुमन हायस्कूल व न्यु इंग्लिश स्कूल येथील सभागृह बांधकामासाठी 25 लक्ष रुपये मंजुरी पत्र प्राचार्य तांबे सर व प्राचार्य बी.एन.माळीसर यांचे कडे सुपुर्द केले. याचवेळी खासदार सुनिल तटकरे यांनी अंजुमन हायस्कूलला 20 संगणक मंजूर केले असल्याचे माहिती देताना ते दोन चार दिवसात हस्तांतरित करू असे सांगितले.आयोजित कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते रायगड भुषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले म्हसळा तालुक्यातील समाजसेवक शिक्षण प्रेमी नाजीम चोगले,कुणबी समाज नेते लक्ष्मण भाये, श्रीपतराव धोकटे यांचा सत्कार करण्यात आला. 

म्हसळ्यात राष्ट्रवादीचा विकासकामांचा धुमधडाका

● खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते 94 लाखांच्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन


देशात किंवा राज्यात सरकार आणि सत्ता नसतानाही खासदार सुनिल तटकरे यांचे विकास कामे करण्याचे कौशल्य हे किती दर्जेदार आहे याचे पुन्हा एकदा दर्शन म्हसळा शहर वासीयांना झाले आहे. केवळ म्हसळा शहरासाठी मंजूर केलेल्या 94 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांनी करून विरोधकांना चपराक दिली आहे. 

माझ्या विजयात म्हसळा वासीयांचा सिंहाचा वाटा असून मतांच्या रूपाने माझ्यावर असलेले ऋण हे कधीही न फेडण्यासारखे असल्याचे प्रतिपादन खास.सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहरातील विविध 

  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्थीच्या दिनी खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते म्हसळा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामाचे उदघाटन व भूमिपूजन सोहळयात नवानगर येथील 33 लाखाचा अंतर्गत रस्ता डांबरीकरण, नगरपंचायत कार्यालय ते गवळवाडी रस्ता 8 लक्ष रुपये डांबरीकरण, सावर बौद्धवाडी येथे 12.5 लाखाचा सामाजिक सभागृह बांधकाम, म्हसळा बौद्धवाडी येथील 6 लाखाची स्मशानभूमी संरक्षण भित बांधकाम, म्हसळा बौद्धवाडी येथील 6 लाखाचा गटार बांधकाम, अंजुमन हायस्कुल येथील 6 लाखाची संरक्षण भित बांधकाम, म्हसळा बौद्धवाडी येथील 3 लाखाचा रस्ता डांबरीकरण व 10 लक्ष रुपयांचा सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम मिळुन सुमारे 94 लक्ष रुपयांचे विकास कामांचा समावेश आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा