संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
दिघी पोर्ट मधून होणाऱ्या अवजड वहातुकीनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आज पहाटे ४.४५ च्या सुमारास अवजड व्काईल चा ट्रेलर म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेतील दुकानांत घुसुन तीन दुकानांचे सुमारे ५ते ६ लक्ष रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. या बाबत नवेनगर येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते नवीद हुसेनमीया जंजीरकर वय ३७ यानी दिलेल्या तक्रारीवरून म्हसळा पोलीसानी मोटरअपघात रजी. नं ९ /२०१९ नोंद केली आहे. MH46BF 5319या क्रमांकाचा ट्रेलर दिघी -म्हसळा दिघी नाका -बायपास्ट मार्गाने माणगाव ( एम.आय.डी.सी. भागाड ) पास्को येथे जात असता नवेनगर परीसरांतील खतीब -लांबे कॉम्प्लेक्स मधील मे.पाटील ट्रेडर्स, सिराजभाई मुसा व लांबे यांच्यां दुकानात ट्रेलर शिरला व अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे
तपासी अंमलदार संतोष चव्हाण यानी सांगितले .मे.पाटील ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत पाटील यानी दुकानांच्या पायऱ्या, शेड,शटर असे सुमारे ४ ते ५ लक्ष नुकसान झाल्याचे सांगितले. सकाळच्या दरम्यान दिघी पोर्टच्या वाहतुकीमुळे बिघडले होते.
"दिघी पोर्टची वाहतुक ही गेले १० वर्ष म्हसळा शहरात नागरी वस्तीतून अनधिकृत पणे होत आहे. अंतरराष्ट्रीय दिघी बंदर व्यवस्थापनाने वाहतुकीची योग्य उपलब्धता नसताना बंदर कार्यान्वीत करायची आवश्यकता नव्हती, म्हसळा शहरातून होत असणारी वाहतुक तात्काळ बंद करावी, माणगाव ते दिघी या ५५ की.मी. अंतरात अशा पद्धतीचे किमान १६३ अपघात झालेले आहेत, सतत होत आहेत MMRDA ने अपघातांचा अभ्यास करावा व रस्त्यांच्या रचनेत सुधारणा करावी"
महादेव पाटील, म्हसळा तालुका प्रमुख शिवसेना.

إرسال تعليق