संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा भाजपा तरफे आज मंगळवार दि १७ सप्टेबर २०१९ तालुक्यात चिखलप आदिवासीवाडी व म्हसळा आदिवासी वाडी येथे अंगणवाडीमधील मुलांना फळ व बिस्किटे वाटप करण्यात आली. तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळ व बिस्किटे वाटप करण्यात आली. जिल्हा नियोजन योजने अंतर्गत झालेल्या ग्रा.मा.१०५ घणेरी कोंड येथे रस्ता तयार करणे. अंदाजित रक्कम १२.०० लक्ष या रस्त्याचे उद्घाटन कृष्णा कोबनाक ,अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती यांच्या हस्ते करण्यात आले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त संपूर्ण देशात सेवा सप्ताह अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये स्वत: मोदी साहेब हे नर्मदा नदीचे दर्शन घेवुन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. यावेळी पंतप्रधन नरेंद्र मोदी साहेबांना देशाची सेवा करण्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना म्हसळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.यावेळी तालुका अध्यक्ष म्हसळा शैलेश पटेल, तालुका सरचिटणीस, जिल्हा कार्य.सदस्य मंगेश म्हशिलकर, तुकाराम पाटील, तालुका सरचिटणीस प्रकाश रायकर, तालुका अध्यक्ष किसान मोर्चा सुनिल शिंदे, तालुका अध्यक्ष श्रीवर्धन श्री.प्रशांत शिंदे, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा सौ.मिना टिंगरे, तालुका अध्यक्ष युवा शरद चव्हाण, शहर अध्यक्ष मंगेश मुंडे, तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा मनोहर जाधव, शरद कांबळे, योगेश महागावकर, अमोल गणवे, सुबोध पाटील, रावजी घाणेकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

إرسال تعليق