रायगड जिल्हा यादव गवळी समाजाने केलेला सत्कार हृदयस्पर्शी आणि कायमस्वरूपी स्मरणात रहाणारा- खासदार सुनिल तटकरे
"समाजाच्या आशीर्वादा बरोबरच बहुजन समाजाच्या भक्कम पाठिंब्यावर मी खासदार झालो."
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
राजकीय कार्यकाळात प्रथमतः रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ.ए.आर.अंतुले यांच्या साक्षीने म्हसळा तालुक्यातील मौजे वाडांबा येथे माझ्या गवळी समाजाने एकत्रित येऊन केलेला सत्कार समाजाचा पहिला सत्कार होता आणि आता खासदार झालो म्हणुन श्रीवर्धन येथे माझ्या समाजा मार्फत झालेला भव्यदिव्य सत्कार मला हृदयस्पर्शी आणि कायमस्वरूपी स्मरणात राहील असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील यादव गवळी समाजाने आयोजीत केलेल्या सत्कार कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केले. यावेळी खासदार तटकरे पुढे बोलताना समाजाच्या मतरुपी आशीर्वाद आणि बहुजन समाजाच्या भक्कम पाठींब्यावर मी खासदार निवडून आलो असा खुलासा केला.श्रीवर्धन आराठी येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सभागृहात ट्रस्टीचे विश्वस्त माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला समाज सेवक महमदभाई मेमन,नगराध्यक्ष बाळ सातनाक,माजी सभापती लाला जोशी,सरपंच उदय बापट,संतोष किर,माजी जिप सदस्या वैशाली सावंत,व्यंकटेश सावंत,आराठी सरपंच श्रीमती काझी,ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुरेश तांबडे,श्रीवर्धन ट्रस्ट ता.अध्यक्ष शरद खेडेकर,सरपंच लिलाधर रिकामे,तळा तालुका माजी सभापती तुकाराम खेडेकर,माणगावचे माजी सभापती प्रकाश लाड,महाडचे जेष्ठ समाज सेवक चंद्रहास मिरगल ,म्हसळा माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,समाज मान्यवर के.टी. पाटील,कासार गुरुजी,खेळु वाजे,तुकाराम साबळे,शांताराम घोले,आरडीसी म्हसळा बँक संचालक तुकाराम महाडिक,समाज मान्यवर शांताराम गायकर,प्रकाश रिकामे,अनंत लाड,रामदास रिकामे,राजेंद्र लटके ,दिगंबर महाडिक,नारायण रिकामे,मोहन लाड,नगरसेवक संतोष काते,संजय दिवेकर,रविंद्र तटकरे,दिपेंद्र धुमाळ,श्रीकांत बिरवडकर,प्रमोद कातेे,आणि जिल्ह्यातील गवळी समाज मान्यवर,महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांनी समाजाला संबोधित करताना भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत विषद करून सांगितल्या प्रमाणे अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन मी माझ्या राजकीय वाटचालीत काम करीत आहे.मतदार संघातील गावावाडीत विकास कामे करीत असताना कधीही जातीपातीचे राजकारण करीत नाही उलट सत्ता असताना आणि नसतानाही सर्व धर्म समभाव जपत अनेक सहकाऱ्यांना विविध निवडणुकीत निवडून आणून अनेक पदांवर लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगितले.संख्येने छोट्या असलेल्या'गवळी' समाजात जन्माला आलो हे सुद्धा माझे भाग्य असून गवळी समाजाचा इतिहासातील अनेक मार्मिक उदाहरणे देऊन त्यांनी आपल्या समाजाप्रती असलेल्या भावांना वाट मोकळी करून दिली याच वेळी तटकरे यांनी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीता मधील संस्कृत भाषेतील विषयांचे दाखले दिले.स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत व गवळी समाजाच्या सामाजिक जडणघडणीत त्यांचे आजोबा,पणजोबा आणि आई वडीलांपासून लाभलेले योगदान कसे होते यावर मार्मिक भाषेत भाष्य केले.माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी गवळी समाजाला सन्मानपूर्वक वागणूक दिली असल्याचे सांगितले.रायगड जिल्हा यादव गवळी समाजाच्या वतीने करण्यात आलेला हा भव्यदिव्य सत्कार हा माझ्या कायम स्मरणात राहणार असून हा सत्कार हृदयस्पर्शी असल्याचे भावनिक मत यावेळी तटकरे यांनी व्यक्त करून गवळी समाजाचे अनेक सामाजिक प्रश्न केंद्रात प्रलंबित आहेत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहणार असल्याचे अभिवचन उपस्थित गवळी समाज बांधवांना खासदार सुनिल तटकरे यांनी दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांचेसह जिल्ह्यातील अनेक समाज मान्यवरांनी सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना खासदार सुनिल तटकरे यांना राजकीय कारकिर्दीस मनोभावे शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق