( म्हसळा प्रतिनिधी,)
म्हसळा तालुक्यात शनी. दि. ३० ऑगष्ट पासून आज पर्यंत पावसाची संतत धार सुरु आहे. आजपर्यंत ४२५२ मि.मि. पावसाची नोंद झाल्याचे ( प्र ) ता.कृअधिकारी ज्ञानदेव अनाप यानी सांगितले.तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानापेक्षा १३७ % पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाचे सरासरी पर्जन्यमान ३१४२ .६४ मि.मि.असताना आजपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४१३६.१६ मि.मि. पर्जन्यमान झाले आहे.जिल्हयांत सर्वात जास्त ६०३५ मि.मि माथेरान येथे पर्जन्यमान झाले आहे. ४ हजार मि.मि.पेक्षा जास्त पाऊस पडलेले जिल्हयातील अन्य तालुके तळा ५०६४मि.मि, पेण ४९३७.९० मि.मि, पोलादपूर ४७९२ मि.मि, माणगांव ४७४५. ०५, रोहा ४६६६ मि.मि, म्हसळा ४२५२ मि.मि, खालापूर ४०७८मि.मि, कर्जत ४०५१.७४. अद्यापही ४०० ते ५०० मि.मि पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
" तालुक्यात मागिल काही दिवसात नैसर्गिक आपत्ती आली नाही ,नैसर्गिक आपत्तीची ५८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत त्याना रु२ लक्ष ४९ हजार ५४८ अनुदान व खरसई धरणात गुराख्याच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी रु ४ लक्ष अनुदान देण्यात आले आहे"
के.टी. भिंगारे, नायब तहसीलदार, म्हसळा .
" म्हसळा तालुक्यात व जिल्ह्यांत सरासरी पेक्षा मोठया प्रमाणात पाऊस झालेला असताना तालुका व जिल्हा प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था यानी वाडया, पाडे , शहर, तालुका स्तरावर येत असलेल्या पाणी टंचाईवर प्रभावी मात करण्यासाठी उपाय योजनां बाबत नियोजन करणे आवश्यक आहे."
अॅड. खलील डीमटिमकर , सामाजिक कार्यकर्ते, म्हसळा.

إرسال تعليق