म्हसळा तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर:कार्यालयीन कामांसाहित आपत्ती व्यवस्थापण ठप्पप



म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी शासनाकडून आपल्या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी गुरवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.महसूल विभागातील कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात सुकसुकट पसरला असून नागरिकांचे महसूल विभागासोबत असणारे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीच्या माध्यमातून हा संप सुरू आहे.सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना,केंद्रा प्रमाणे भत्ते मिळणे,रिक्त पदे तत्काळ भरणे,अनुकंपाखाली नियुक्त्या करणे,हिवताप विभागाचे जिल्हापरिषद हस्तांतर रद्द करणे,सरकारी विभागातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करणे यांच्या सहित अनेक मागण्या सरकारी कर्मचार्‍यांच्या असून हा संप पुकारला असल्याचे कर्मचार्‍यांनी संगितले.म्हसळा तहसील कार्यालयात सुरू असलेल्या संपामध्ये जितेंद्र टेंबे,एन.बी.सानप,विशाल भालेकर,सचिन धोंडगे,प्रकाश भोईर,गोविंद चाटे,सरिता लिमकर,तृप्ती साखरे,महेश रनदिवे यांच्या सहित लिपिक,रखवालदार,स्वछक,गोदाम पाहरेकरी संपावर गेलेत.म्हसळा तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नेये म्हणून स्वता तहसिलदार एकटेच कार्यालयात उपस्थित असून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करीत आहेत.मात्र तहसील कार्यालयातील कर्मचायर्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा