संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
येणारी विधान सभा व पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी म्हसळा तालुका शिवसेनेची सभा आज जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी जिल्हा प्रमुख नवगणे यानी शिवसेना हा एकसंध पक्ष आहे.पक्ष नेतृत्वाचे प्रत्येक निर्णयावर शिवसैनिकांची निष्ठा -श्रध्दा असते.पक्ष नेतृत्वाने प्रवेश दिलेला प्रत्येक कार्यकर्ता हा सच्चा शिवसैनिक असतो त्यामुळे पक्षात जुना- नवा अथवा भेदभाव नसावा असा संघटनेचा उद्देश आसल्याचे उपस्थित शिवसैनिकाना सांगितले यावेळी नवनियुक्त तालुका प्रमुख महादेव पाटील, जनार्दन खेडेकर, पांडुरंग बने, तुकाराम चाळके, अनंत नाक्ती, विठ्ठल महाडिक , नवनीत पारेख , अॅड. मुकेश पाटील, मेघश्याम खेडेकर, अमीत महामुनकर आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रमुख नवगणे यानी शिवसेना श्रीवर्धन मतदार संघात अद्यापही पिछाडीवर आहे माझ्या सह आपण सर्वानी निष्ठेने पक्षाचे काम करायचे आहे. भविष्यात या मतदार संघाचे माझ्या हातून नेतृत्व व्हावे अशी माझी ईच्छा असल्याचे सांगितले.तालुका प्रमुख महादेव पाटील यानी योग्य प्रसीध्दी, सोशल मिडीया व अन्य साधनांचा प्रभावी वापर कशा प्रकारे करणे या बाबत सांगताना तालुका पातळीवर २, मुंबई, मतदारसंघ निहाय गृप आहेत त्यामध्ये अद्यापही अनेक शिवसैनीक समावीष्ट करणे आवश्यक आहे , या सोशल मिडीयाचा वापर योग्य पद्धतीने व्हावा असे सांगितले. पाटील यानी राजकीय विश्लेषण करताना तालुक्यातील सुमारे ५५ बुथ वर शिवसेना पिछाडीवर आहे . तालुक्यातील जुन्या अनेक शिवसैनिकानी मागील काही वर्षांत विकास कामासाठी अन्य पक्षांत गेले होते ,पक्ष संघटनेच्या ध्येय धोरणा नुसार ते भविष्यांत शिवसेनेत नक्कीच प्रवेश घेतील अशा वेळी कोणतेही जुना -नविन वाद असता कमा नये असे मत व्यक्त केले. पाटील यानी युवा शक्तीचा आदराने उत्लेख करत भविष्यात संघटनेत त्याना प्राधान्याने स्थान असणार आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व बुथचे मजबुती करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी माजी ता. प्रमुख नंदू शिर्के, गजानन शिंदे, अमोल पेंढारी, मुकेश पवार, कृष्णा म्हात्रे, गणू बारे, मुन्ना पानसरे आदीनी आपले मत व्यक्त केले.



إرسال تعليق