फोटो संदिप रिकामे यांची शिवसेना बागमांडले उपविभाग प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र देताना शिवसेना पदाधिकारी व मान्यवर
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
श्रीवर्धन तालुक्यातील वडघर गावचे सुपुत्र तथा कट्टर शिवसैनिक श्री.संदिप पांडुरंग रिकामे यांची शिवसेनेच्या बागमांडले उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथर यांनी संदिप रिकामे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
वडघर गावचे सुपुत्र तसेच युवकांचे प्रेरणास्थान तरुण तडफदार नेतृत्व संदिप रिकामे हे कट्टर शिवसैनिक असून अनेक वर्षे ते शिवसेना पक्षाचे एक निष्ठेने काम करीत आहेत. तालुका पातळीवर शिवसेना पक्षात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. संदिप रिकामे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करणारे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. अनेक गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरणे समाजमानासात पोहचविण्याचे काम करीत आहेत.
रिकामे यांच्या या निवडीबाबत त्यांच्यावर त्यांच्या हितचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

إرسال تعليق