श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात युतीत भाजप ठरणार वरचढ


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
मुख्य निवडणूक आयुक्तानी राज्याचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तरी राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा -सेना युतीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे युतीचे उमेदवार, पदाधिकारी , कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. श्रीवर्धन मतदार संघातही तीच परिस्थीती आहे. त्यामुळे दोनही पक्षांतील मंडळींमध्ये योग्य व प्रभावी समन्वयापेक्षा आत्ताच्या परिस्थीतीत संभ्रमावस्था जास्त आहे.
भाजपा- सेना दोनही पक्षाने घेतल्या मुलाखती भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या श्रीमती नीता केळकर यांच्या समक्ष श्रीवर्धन मतदार संघातून मागील विधानसभेचे उमेदवार श्री कृष्णा कोबनाक , श्रीवर्धन तालुक्यातील श्री मनोज गोगटे, प्रशांत शिंदे, माणगाव तालुक्यातील संजय उर्फ आप्पा ढवळे , रोहा तालुक्यातील संजय कोनकर यांच्या मुलाखती झाल्या , कृष्णा कोबनाक यानी मतदारसंघातील श्रीवर्धन , म्हसळा, तळा, माणगांव व रोहा मधील विविध भागांत शासनाचे माध्यमातून गाव, वाडी, वस्ती, शहरात केलेल्या विकास कामाचा आढावा दिला, त्याच बरोबरीने, वृक्ष लागवड, घरकुल योजना , गॅस वाटप आदी कामातील कार्यकर्त्यांच्या सहभागासह माहीती दिली.
शिवसेनेने मतदार संघातून जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, रवी मुंढे, समीर शेडगे, महादेव पाटील यांची चाचपणी केली. श्रीवर्धनचे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार अवधुत तटकरे, श्रीमती रेवती तटकरे यांचे बाबत सुध्दा विचार सुरु आसल्याबाबत जेष्ठ शिवसैनीकांत चर्चा आहे.
श्रीवर्धन मतदार संध १९९०. ते २००९ पर्यंत शिवसेनेचा बलाढय मतदार संघ होता. २००९ चे सार्वत्रीक निवडणूकीत खासदार सुनील तटकरे यानी विकासाचा मुद्दा व कास धरत विजय मिळविला. यावेळी शिवसेनेतील अंर्तगत कलह, गट- तट यामुळे शिवसेनेला हार खावी लागली. २००९ ते आजपर्यंत शिवसेनेची संघटनात्मक ताकत फारच कमी पडत आली. तर दुसऱ्या बाजूने अंर्तगत कलहात वाढ होत आहे.
२०१४ पासून तालुक्यात नव्यानेच अस्तीत्व निर्माण करणाऱ्या भाजपाने शत- प्रतिशत, करीत आपले स्थान व संघटनात्मक ताकत बऱ्यापैकी निर्माण केल्याचे चित्र आहे.

"उमेदवारी देणे ही संघटनात्मक राजकीय निर्णय प्रक्रिया आहे. युती होवो किंवा न होवो पक्ष देईल त्या उमेदवाराचे आम्ही निष्ठेने काम करणार " मतदार संघातील युतीतील नेते मंडळी

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा