( म्हसळा -प्रतिनिधी)
जमाते मुस्लीमीन गोंडघर यांच्या व ग्रामपंचायत गोंडघर तर्फे गोंडघर मध्ये नुकतेच आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गोंडघर पंचक्रोशीतील वेळास, भावे, खानलोशी, वडवली या गावातील सुमारे १२० रुग्णांची या वेळी म्हसळा येथील अल अहमद हॉस्पीटलच्या डॉक्टर आयशा नदाप व त्यांच्या सहकारी सुमय्या फणसे यानी रुग्णांचे आरोग्य तपासणी, औषधे वाटप, डायबीटीस तपासणी, स्त्रीरोग, मुतखडा, कॅन्सर, रक्तदाब, बालरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्याचे आयोजकानी सांगितले. कार्यक्रमाला सरपंच लहू तुरे, उपसरपंच शहनाज जामदार, माजी सरपंच अक्रम साठवीलकर,जमाते मुस्लीमीनचे उपाध्यक्ष सहमद साठविलकर, कुणबी समाजाचे अध्यक्ष दिनेश बामणे,शब्बीर भाई मुर्तुजा, अन्वर खानजादे, मुक्त्यार सोंडे, बीलकीस साठवीलकर, आरीक बगदादी, संतोष धुमाळ, प्रमोद भुवड व स्थानिक मंडळींचा सहभाग होता. सरंपच तुरे यानी अल अहमद हॉस्पीटलचे व डॉ.आयशा नदाम त्यांचे सहकारी यानी सेवाभावे केलेल्या तपासणीचे ग्रामपंचायत व स्थानीकांचे माध्यमातुन कौतुक केले व आभार मानले.

إرسال تعليق