राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा श्रीवर्धन शहरात
अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्र्या कडून महाजनादेश यात्रेचे आयोजन ....अमोल कोल्हे
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
रयतेचे राज्य पुन्हा राज्यात सत्तेत आणण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा श्रीवर्धन मध्ये आली आहे .जनतेला आता बदल हवा आहे आणि आम्ही तो घडवणार असे अमोल कोल्हे यांनी सांगितले .
खासदार अमोल कोल्हे प्रमुख प्रचारक असलेली प्रचार यात्रा खालापूर येथून पाली, वाकण , तळा येथून श्रीवर्धन शहरात आली . श्रीवर्धनच्या र ना राऊत विद्यालयाच्या प्रांगणात सभेचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आले होते.
श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांना अल्प संख्यांक तालुक्यांचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नक्वी यांची भेट घेतल्याचे तसेच
श्रीवर्धन मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यामुळेच खासदार झालो असे सुनील तटकरे यांनी सांगताना मतदारांचे आभार मानले.
सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे मुख्य प्रचारक अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर टीका केली . राज्यात गेल्या 5 वर्षात 16000 शेतकरी आत्महत्या झाल्या, मुख्यमंत्रांचे नागपूर शहर
हे गुन्हेगारीत प्रथम क्रमांकाचे शहर झाले आहे, सामान्य जनतेसाठी भरीव कार्य केले असते तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरज पडली नसती अशी टीका खासदार कोल्हे यांनी यावेळी केली . एम आय डी सी सेक्टर बंद पाडले, त्यातून 1 लाख 46 हजार कंपन्या बंद झाल्या , एकट्या महेंद्र अँड महेंद्र कंपनीतून 10,000 लोकांना कमी करण्यात आले, पार्ले जी सारखी अनेक वर्षे चाललेली कंपनी बंद झाली, आज तरुणांना रोजगार उपलब्ध नाही ,ग्रामीण भागातील हजारो युवक पोलीस भरती ची स्वप्ने डोळ्यात घेऊन जगत आहेत मात्र आघाडी सरकारच्या काळात आर आर पाटील यांनी दर वर्षी सुरू केलेली पोलीस भरती ह्या सरकारने केली नाही असे सांगतानाच महा पोर्टल मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे जो मीडिया ने जनतेसमोर आणला पाहिजे असे आवाहन डॉक्टर कोल्हे यांनी केले. मध्यप्रदेश मधील ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या कंपनीला महा पोर्टल चे काम दिले असून त्याची चौकशी झाली पाहिजे असेही कोल्हे यावेळी म्हणाले.
पावसात चिंब भिजत असतांना जनता आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे निष्ठेचे प्रतीक आहे असे अमोल कोल्हे यांनी म्हटले
आदीती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस च्या विधान सभेच्या उमेदवार असतील असे कोल्हे यांनी सांगितले .
सदरच्या सभेसाठी अदिती तटकरे , अनिकेत तटकरे , दाजी विचारे , दर्शन विचारे , जितेंद्र सातनाक गणेश पोलेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .

إرسال تعليق