खारगावखुर्द येथे पोषण पाखवडा संपन्नम्हसळा


म्हसळा  वार्ताहर 
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने माहे सप्टेंबर महिन्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालया मार्फत कुपोषण मुक्त भारत करण्यासाठी सही पोषण,देश रोषण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तालुका स्तरावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सहकार्य आणि ग्रामस्थांचा सहभाग घेत दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत रोज वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.त्याचेच अनुषंगाने  दिनांक 21/09/2019 रोजी खारंगाव खुर्द आणि सकलप येथे पोषण पाखवडा कार्यक्रमाची(साहिपोषण,देशरोषण) रॅली काढण्यात आली. कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,पर्यवेक्षिका रेणुका  पाटील, ग्रामसेवक डी.एच.गमरे, आशा वर्कर वनिता पाटील,सेविका माया खोत,सोनाली साळवी,मदतनीस शकुंतला लोणशिकर,भारती पाटील आणि ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.वाजतगाजत घोषणा देत पोषण पाखवडा भव्य रॅली गावाचे मध्यवर्ती आल्यावर उपस्थितांना कार्यक्रमाची माहिती देऊन सांगता करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात जनसामान्यांपर्यंत योग्य पोषण हा विषय पोहचविण्यासाठी १ सप्टेंबरपासून महिनाभर प्रत्येक घर घरात पोषण उत्सव राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा