संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शहरातील घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांजवळील गोडाऊन मधील कांदा साठा संपल्याने काल पर्यंत ३०-३५ वर घुटमळ णारा कांदा आता सर्वत्र रु ४० वर येऊन ठेपला आहे.कांदा दरात वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. म्हसळा बाजारपेठेत ४०ते ५० किराणा दुकाने असून आज सर्व दुकानांतून कांद्याचा दर रु'४० प्र.कि. आसल्याचे समजते. व्यापाऱ्यानी साठा केलेला कांद्याचा साठा घटल्याने त्याचा फटका किरकोळ बाजाराला बसला असून, होलसेल बाजारांत कांद्याचे भाव वाढल्याने किरकोळ बाजारांतही कांद्याच्या विक्री दरांत प्रचंड वाढ झाली. दरवाढीमुळे किरकोळ विक्रित घट झाल्याचे दिसून येत आहे. कांद्याचे दराने चाळीशीपार केल्याने, ग्राहक कांदा खरेदी करणे टाळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले
"वाशी , पुणे ,नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत तसेच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याला आठ ते दहा दिवसांपासून मागणी वाढली आहे , आवक कमी असल्याने भाव वाढत आहे. निवडणुकी जाहीर झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयामार्फत किंमत स्थिरीकरणाच्या उद्देशाने नाफेडने खरेदी केलेला कांदा आता विक्रीसाठी बाहेर काढला तर भाव कमी होण्याची शक्यता आहे"
मेमन शेट ( होलसेल व्यापारी )
" आमचे ६ माणसांच्या कुटुंबाला आठवडयाला विविध भाज्यांतीत वापरासाठी १० किलो कांदा लागत असे भाव वाढल्यामुळे व आर्थिक बजेटमुळे कांद्याचा वापर चार किलोवर आणला आहे. काही वेळा कांद्याला पर्याय म्हणून कोबीचा वापर केला जातो"
पार्वती पदरत ( गृहीणी )

إرسال تعليق