माजी मुख्यमंत्री बॅ ए.आर.अंतुले यांच्या आंबेत गावी बेकायदेशीर दारु विक्रीला पोलीसांचा चाप.
आरोपीसह मुद्देमाल जप्त
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री बॅ ए. आर.अंतुले यांच्या आंबेत गावी देशी,विदेशी दारूची आरोपीच्या रहाते घरात अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्या दोन जणांना गोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी छापा टाकुन रंगेहात पकडल्याची घटना घडली.आंबेत येथील समीर यशवंत वाईकर वय वर्षे 45 विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी- विदेशी दारू साठा करून गणेश बाबुराव सावंत ह्याला विक्री करीत असताना रंगेहाथ पकडून त्यांचे विरोधात गोरेगाव पोलिसांनी
मुंबई पोव्ही.ऍक्ट कलम 65 खंड 'ड'प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.आरोपी वाईकर याचे घरातील बेडरूम मधून पोलिसांनी देशी,विदेशी दारूचा 30 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल आणि रु 1 लक्ष 9 हजार 430 रुपयांची रोकड जप्त केली.आंबेत दुरक्षेत्रातील हद्दीत आरोपी समीर वाईकर हे रहाते घरात अवैधरित्या देशी विदेशी दारूचा धंदा करित असल्याची खात्रीशिर खबर पोलीस हेडकोन्स्टेबल गणेश पवार यांना मिळाली असता त्यांनी पोलिस निरीक्षक श्री टोम्पे यांचे मार्गदर्शन घेऊन सहा.फॊजदार ढोबळे,पोलीस कर्मचारी व्ही.एम.ठाकुर,आर.ए.गोसावी,पी.आर.साळुंखे यांनी सापळा रचून आरोपी याचे घरात देशी,विदेशी दारूचा साठा व दारू विक्री करीत असणारा इसम रंगेहाथ पकडला.

إرسال تعليق