डॉ.मुब्बशीर जमादार यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; दिल्ली येथे पुरस्कार सोहळा संपन्न
म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
सीईडी फाउंडेशन ट्रस्ट दिल्ली येथील संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात देशभरात आदर्शवत काम करणाऱ्या काही मोजक्याच शिक्षक वर्गाला 8 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. म्हसळा येथील शाहीन केजी स्कूलचे संस्था चालक मुब्बशीर इब्राहिम जमादार यांनी रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अगदी कमी कालावधीत उत्कृष्ट काम केल्याने त्यांच्या कामाची देश पातळीवर दखल घेऊन त्यांना सीईडी फौंडेशन ट्रस्टने दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले आहे. पुरस्कार प्राप्तीसाठी देशाभरातुन कार्यरत 1654 शिक्षकांनी अर्ज केले होते पैकी आदर्शवत 100 शिक्षकांना सीईडी ट्रस्ट तर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले त्यामध्ये मुब्बशीर जमादार यांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रातच मुब्बशीर जमादार यांनी डॉक्टरेट प्राप्त केली आसुन त्यांना या अगोदर अनेक शिक्षण संस्थेने तालुका, जिल्हा आणि परदेशातही आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे. उच्च शिक्षित मुब्बशीर जमादार यांनी खडतर कालावधीत गरिबीमध्ये शिक्षण घेत आपल्या शिक्षणाचा समाज जीवनासाठी महत्त्व ओळखून तो इतरांना देण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर कार्य करीत आहेत. मराठी, हिंदी, अरबी, उर्दु आणि इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने जमादार यांनी कमी कालावधीत आदर्श शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. पुरस्कार प्राप्त जमादार सर यांचे रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

إرسال تعليق