श्रीवर्धन कुणबी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरवाचे आयोजन



 गणपत  कातकर हे समर्पित आयुष्य जगणारे व्यक्तिमत्त्व  होय..... अरुण शिगवण

श्रीवर्धन प्रतिनिधी  संतोष सापते

मानवी जीवनाला समर्पक आकार देण्याचे काम शिक्षण करते. शिक्षित व प्रतिभावंत व्यक्ती समाजाची धुरा समर्थपणे पेलत समाजाच उत्कर्ष साधतो.  गणपत कातकर हे समर्पित आयुष्य जगणारे नेते आहेत. असे प्रतिपादन अरुण शिगवण यांनी कुणबी समाज आयोजित गुणगौरव कार्यक्रमात केले. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील कुणबी समाजाला  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, समाज  सुधारणा, व सक्षम नेतृत्व गणपत कातकर यांनी केले. समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी तळागाळातील व्यक्ती पर्यंत आधुनिक विचार पोहोचवण्यासाठी गालसुरे, जसवली, दांडगूरी, वाळवटी अश्या विविध गावांमध्ये शाळारुपी ज्ञानमंदिरांची स्थापना केली. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे ते बागमांडला वास्तव करणारे डोंगर कुणबी, गोडेरी कुणबी व तिल्लोरी कुणबी यांना एकत्र करून कुणबी समाजात ऐक्य निर्माण करण्याचे काम गणपत कातकरांनी केलं. कुळ कायद्याच्या निर्मितीनंतर सर्वसामान्य कुणबी व्यक्तीच्या हक्काची जमीन मिळवून देण्याचे काम कातकरांच्या माध्यमातून झाले. कातकर हे समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर जगले. त्यांच्यामुळेच समाजातील अनिष्ट रुढीपरंपरा नष्ट झाल्या. शिमग्याची काळातील सोंग, देवदेवस्की या अनिष्ट प्रकारचे उच्चाटन करण्यात आले. 1961 पासून कुणबी समाजाच्या अधिवेशने आयोजित करून समाज प्रगतीचा मार्ग ग स कातकरांनी निर्माण केला. असे अरुण शिगवण यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात सांगितले. कुणबी समाज शिक्षण समितीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत 73 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या विजेत्यांचे बक्षीस वितरण व शालेय परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुणबी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी कृष्णा भोंबडे, रेणुका जोशी, दशरथ कातकर, काप गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे, हुनरवेल, भोस्ते, चिखलप, नानवेल, जसवली, गालसुरे, मेघरे अश्या विविध गावातील विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानदान क्लासेस चे तुषार घाडगे यांनी स्पर्धा परीक्षा व ग्रामीण भागातील तरुण या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन निंबरे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा