सूरई येथे शिवसेनेच्या माध्यमातून समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन


म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा तालुक्यातील सूरई येथील समाजमंदिराचे भूमिपूजन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या हस्ते करण्यात आले .आमदार अवधूत तटकरे यांचा आमदार निधीतुन हे  काम होणार आहे. या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते बाळ करडे, तालुका प्रमुख महादेव पाटील, सुरेश कुडेकर, विभाग प्रमुख गणू बारे, ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग बने, सरपंच अनंत नाक्ती, संतोष जाधव, शांताराम जाधव, महिला अध्यक्ष श्रद्धा जाधव, आणी ग्रामस्थ उपस्थित होते.म्हसळा तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून अनेक वर्षे प्रलंबित असलेला समाजमंदिराच्या कामाचा प्रश्न सरपंच अनंत नाक्ती, आणी ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव यांच्या पुढाकाराने मार्गी लागला असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा