संजय खांबेटे : म्हसळा -प्रतिनिधी
पावसाने उघडीप दिल्यावर म्हसळयातील बाजारांत बकरी ईद -नारळी पोर्णिमा -रक्षाबंधन या विविध सणा निमीत्त ग्राहकाने बाजारांत बऱ्यापैकी गर्दी केली आहे. कापड, किराणा, ड्रायफ्रुट ला मागणी वाढली आहे. ड्रायफ्रूट खरेदी करताना ग्राहक चांगल्या दर्जाचे मालाची मागणी शहरात रेडीमेड कपडयाना मागणी वाढत असताना रमेश क्लॉथ, भाग्यलक्ष्मी क्लॉथ, राजलक्ष्मी क्लॉथ यांचेकडे ग्राहक बऱ्यापैकी आर्कषीत झाला आहे.शहरांत ड्रायफ्रूट विक्रीची किमान १५ दुकाने आहेत त्यामध्ये मक्की स्टोअर्स, P.B. सावंत, आदील ट्रेडर्स, इम्रान किराणा, फरीद मेमन, इकबाल मेमन या सोबतच क्रेसेंट, नोबल, RRC, अलमार्ट, ब्लोझम हे मॉलही म्हसळा करांचे आकर्षण होत आहे.
म्हसळयातील ड्रायफ्रूटचे बाजारभाव पुढील प्रमाणे. प्र.किलो
काजू ( रु१०००ते १२००) , बदाम ( रु ८०० ते१०००), पिस्ता ( रु१८००ते २०००), चारोळी ( रु१०००ते १२००), बेदाणे ( ३००), मनुके ( रु४००), वेलची ( रु४०००ते ४५००) , खारीक( रु२००ते ३००), खजूर लाल ( रु७०ते ८०), काळा खजूर ( फरद) रु२४०ते २६०), अंजीर ( रु१र००ते १४००).
"बकरी ईदी पेक्षा रमजान ईदला सुक्या मेव्याची मागणी जास्तअसते शहरात बहुतांश ग्राहक व महीला वर्ग मक्की स्टोअर्स मधील (होलसेल दर व उच्च प्रातिचा माल) ड्राय फूट पसंत करतात."
जमीर दफेदार, ग्राहक


إرسال تعليق