म्हसळा प्रतिनिधी
वर्षभर सातत्याने काम करून हक्काचे वेतन मिळविण्या साठीही म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांना झगडावे लागत आहे. पावित्र बकरी ईद निमीत्त प्राथमिक शिक्षकाना १ ऑगस्ट पर्यंत पगार द्यावे असे शालेय शिक्षण क्रिडा विभागाचे पत्र, तसेच शासन परिपत्रक २४१५ / १५/१५ दि.१३/ ८/२०१५ चे नुसार प्राथमिक विभागातील शिक्षकांना महिन्याच्या १ ताखेला पगार द्यावा असा स्पष्ट ऊल्लेख आहे.तरीसुद्धा म्हसळा पंचायत समीतीने अद्यापही शिक्षकाना पगारच दिले नसल्याचे चित्र आहे. महिन्याच्या १ तारखेस वेतन द्यावे असे असताना प्रक्रियेतील ही दिरंगाई शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार व पं.स. चे अर्थ विभागाचा योग्य समन्वय नसल्याने तालुक्यातील शिक्षकाना दर महिन्याच्या एक तारखेला अन्य विभागांतील कर्मचाऱ्यां-प्रमाणे शिक्षकांचे वेतनही होणे अपेक्षित आहे.वास्तविक पहाता महिन्याचे आर्थिक गणित बांधण्यापूर्वी हाती वेतन मिळणे अपेक्षित आहे. अनेक शिक्षकांनी घर अथवा तेथील सुविधांसाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे. महागाईचा वाढता डोंगर, कुटुंबाची जबाबदारी आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी वेतन मिळणे गरजेचे आहे, मात्र उशिरा मिळणाऱ्या वेतनामुळे कष्ट करूनही ऐनवेळ दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे. म्हसळा तालुक्यातील शिक्षकाना हा त्रास प्रत्येक महिन्याला होत असतो.
"शनी.दि. १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट पर्यंत तब्बल ६ दिवस बॅंका बंद आहेत मग पगार कधी मिळणार व देणे कधी देणार अशी चर्चा शिक्षक वर्ग करीत आहेत"

إرسال تعليق