संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा व महादेव पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मा.शिवसेना प्रमुख ऊध्ववजी, ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि.२७ रोजी वृक्ष वाटप ,वृक्ष संवर्धन व बोरींगचे उद्घाटन , मुलांना खाऊ वाटप कार्यक्रम सकाळी करण्यात आला संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते शाळेच्या प्रांगणात पार पडला यावेळी खारगाव ग्राम पंचायतीचे सरपंच अनंत नाक्ती. ॲड.श्री मुकेश पाटील , पालक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्र संचालन विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.जिद्दी शिंदे हिने , प्रास्ताविक सुतार यानी,तॲड.मुकेश पाटील यांनी वृक्षाचं महत्व , सर्वधन व निगा व पर्यावरण विषयी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष पाटील यानी बोरींग साठी ज्यांचे सहकार्य मिळाले ते विद्यमान आमदार अवधूतजी तटकरे साहेब यांचे आभार व्यक्त केले.तसेच गटविकास अधिकारी प्रभे साहेब इंजिनियर श्री राजू पवार व वरवठणे ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांचे आभार मानले तसेच ज्यांच्या द्वारे वृक्षांची पुर्तता करण्यात आली.त्या सामाजिक वनीकरणाचे अंबावकर साहेब यांचेही आभार मानले.त्यानंतर वृक्षाची जोपासण्याची जबाबदारी मुलांना सांगितले यानंतर पहिल्यांदा बोरींगचे उद्घाटन पाटील साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेत बदामाची झाडे ॲडओकेट मुकेश पाटील व पाटील साहेबांनी लावली. मुलांना खाऊ वाटून या कार्यक्रमाची सांगता झाली.


إرسال تعليق