स्मार्ट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला मान्यवरांचा निरोप ; सहा. पोलीस निरीक्षक सोनके यांची मांडवा येथे नियुक्ती.


स्मार्ट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला मान्यवरांचा निरोप
दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकला भावपूर्ण शुभेच्छा ; सहा. पोलीस निरीक्षक सोनके यांची मांडवा येथे नियुक्ती.


दिघी ( गणेश प्रभाळे ) - दिघी सागरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक डी. टी. सोनके यांची शुक्रवारी (ता 26) रोजी मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे बदली झाली. त्यानिमित्ताने पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती.
अतिशय दांडगा जनसंपर्क व बोलण्याचे कौशल्य असलेल्या सोनके यांची 2017 जून रोजी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती. दिघी सागरी पोलिस स्टेशन हद्दीत दोन ते तीन वर्षांच्या अल्पकालावधीत सोनके यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. जनता व पोलीस प्रशासन असा संवाद वेळोवेळी साधला. तीन वर्षांपूर्वी तर श्रीवर्धन म्हसळ्यात दरोडा व घरफोड्या यांच्या घटना प्रचंड वाढल्या होत्या. त्यांना आळा घालण्याच्या प्रयत्न पोलिस निरीक्षक सोनके यांनी केला. मधल्या काही काळात म्हसळा व श्रीवर्धन पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला. गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पोलिस स्टेशनमध्ये स्वतः रोज वेळेवर हजर राहून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लावण्याचे काम सोनके यांनी केले. पोलिस स्टेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. त्यातून पोलिसांसह नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते. त्याचाच प्रत्यय  या कार्यक्रमात दिसून आला. महिलांना वेळोवेळी मिळालेली मदत या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचमुळे असे महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी निरोप समारंभात आवर्जून सांगितले. परिसरातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनच्या कामकाजाची माहिती पोलिस स्टेशनची भेट घडून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये पोलीसांविषयीची भीती कमी करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याची विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे काम केले.
सोनके यांच्या बदली निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमात महंमद मेमन, शामकांत भोकरे, सुकुमार तोडलेकर, निवास गाणेकर, सदानंद खेऊर, रमेश घरत, चंद्रकांत चाळके, शाम नाक्ती, उदय बापट, डॉ. सुजाता बापट, अशातोष पाटील, गणेश पाटील, शब्बीर उड्रे, दिलीप नाक्ती, रत्नाकर पाटील, दिनेश चोगले आदी मान्यवरांनी व पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील पहिलेच स्मार्ट पोलीस स्टेशन होण्याचा मान हा दिघी सागरी पोलीस ठाण्याला मिळाला शिवाय जिल्ह्यातील पाहिले आय एस ओ मानांकन मिळालेले हे जिल्ह्यातील पहिलेच पोलीस ठाणे. या व्यतिरिक्त पर्यटकांच्या सुरक्षा व सोयींसाठी राज्यातील पहिली पोलीस हेल्पलाईन सुरू दिघी सागरी पोलीस ठाण्यात सुरू होऊन पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केलेल्या दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सोनके हे पहिलेच अधिकारी आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा