म्हसळा (बाबू शिर्के)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पुस्तके वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्व बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमेला अभिवादन करून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना शहरप्रमुख अनिकेत पानसरे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील देवघर हायस्कुल येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष सुर्वे यांनी गरीब विदयार्थ्यांना पुस्तके आणी वह्यांचे वाटप केले, वरवटने येथे माजी सभापती महादेव पाटील यांनी जिजामाता हायस्कुल मध्ये खाऊ वाटप केले तर तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी खामगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, माजी सभापती महादेव पाटील, उपतालुका प्रमुख भाई कांबळे,महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, निशा पाटील, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, श्याम कांबळे, सचिन महामुनकर, प्रसाद जावळे, अमोल पेंढारी, बाळा म्हात्रे, प्रसन्ना निजामपूरकर आदींसह असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


إرسال تعليق