म्हसळयामध्ये शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा

फोटो-शिंपी समाज म्हसळा तर्फे संत शिरोमणि नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रसंगी पुजा करताना अनिकेत पानसरे व सौ.पुजा पानसरे दिसत आहेत.

म्हसळयामध्ये शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा:पानसरे कुटुंबाला मिळाला पूजेचा मान
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा शहर शिंपी समाजातर्फे संत शिरोमणि नामदेव महाराज यांचा 669 वा संजीवन समाधी सोहळा शिंपी समाज मंदिरात साजरा करण्यात आला.यावेळी अनिकेत पानसरे व पुजा पानसरे यांना पूजेचा मान मिळाला असून,शिंपी समाज बांधवांनी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भजन गायले.संपूर्ण शहरातून संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमे सोबत शिस्तबद्ध दिंडी काढून शांततेचा संदेश देण्यात आला.यावेळी शिंपी समाज अध्यक्ष संजय पाटूकले,उपाध्यक्ष अजय करंबे,सेक्रेटरी संतोष पानसरे, खजिनदार संतोष
पानसरे, महिला मंडळ अध्यक्षा पूजा करंबे,माजी अध्यक्ष दिलीप पानसरे,उदय कळस,ओमप्रकाश कोकचा,प्रसाद जावळे,प्रदीप कळस,हृषीकेश करंबे,हेमंत बारटक्के, महेंद्र हेंद्रे,श्रवण कोकचा,महेंद्र ढवळे,रोहण कळस यांच्यासहित
शिंपी समाजातील सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होते.म्हसळा शिंपी समजा तर्फे संत शिरोमणि नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करताना
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.



Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा