संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
पंडीत दिनदयाळ उपाध्याय विशेष अभियाना अंर्तगत म्हसळ्यात १०० % शिधा पत्रिका वाटप , धान्य वाटप व गॅस कनेक्शन वाटप या अभियानासाठी म्हसळा महसुल विभाग
शरद गोसवी,अण्णाप्पा कणशेट्टी(तळा तहसीलदार),के.टी. भिंगारे नायब तहसीलदारम्हसळा,देविदास खेडेकर नायब तहसिलदार तळा,एन.बी.सानप, पुरवठा अव्वल कारकून, विशाल भालेकर, नरेश पवार . HP गॅसचे डिलर सैयद अहमद कादिरी, जहीर कादिरी, मॅनेजर सलीम दोंदीलकर, सुपरवायझर अनिल जंगम व तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते.यावेळी अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत पंडीत दिनदयाळ उपाध्याय विशेष अभियाना अंर्तगत ४४ लाभार्थीना शिधा पत्रिका व गॅस कनेक्शन वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये साळविंडे ५, म्हसळा, निगडी, चिरगाव प्रत्येकी ४,पाभरे ३, देवघर, ताम्हणे, गाणी, ठाकरोली, घुम,गाणी कोंड, प्रत्येकी २, ढोरजे, मजगाव, पेडांबे, खरसई,भापट व गोंडघर प्रत्येकी १ कनेक्शन देण्यात आल्याचे पुरवठा अधिकारी सानप यानी सांगितले.15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीन दयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत धुरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा सर्व शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळणार आहे, सर्व पात्र कुटुंबाना १०० % शिधा पत्रिका वाटप ,धान्य वाटप असा कार्यक्रम संपुर्ण राज्यांत राबविण्यात येत आसल्याचे यावेळी तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले.


إرسال تعليق