संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्हयात बुधवार दि. २४ जुलै पासून आज मंगळवार दि. ३० जुलै पर्यंत पावसाने ९६.५८ च्या सरासरीने ७ दिवसांत एकूण २४०४.२४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. जिल्ह्याचे मागील वर्षाचे सरासरी पर्जन्यमान ३१४२.६४ मिलिमीटर होते .यंदाचा जुलैमधील पाऊस हा मागील पाच वर्षांतील सर्वाधिक पाऊस आसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सर्वात जास्त माथेरान ३४५९.६० मिलिमीटर , पेण ३२५४.२०मिलिमीटर तर सर्वांत कमी आलिबाग तालुक्यात १२५१.२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यातील आज पर्यंतचे पर्जन्य मान पुढील प्रमाणे. मुरुड १९२२, पनवेल २५७९.५८, उरण १७३७.५०, कर्जत २४०९.६०, खालापूर २३१८, माणगाव २७४२.०५, रोहा २८०९, तळा ३०१९, महाड २०२५,पोलादूर २५२७, म्हसळा २५२२, श्रीवर्धन १९१० मिलिमीटर पावसाची नोंद आहे.
"पर्जन्य नक्षत्रे म्हणून ओळखली जातात, ती नक्षत्रे म्हणजे मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत. पुष्य नक्षत्रात संथ, सतत पाऊस पडतो म्हणून या पावसाला ‘म्हातारा पाऊस’ म्हणतात. आश्लेषा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘आसळकाचा पाऊस’ म्हणतात. मघा नक्षत्रात पुन्हा कडाडत जोरदार पाऊस पडतो म्हणून या पावसाला ‘सासूंचा पाऊस’ म्हणतात. हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्तीचा पाऊस’ असे म्हणतात.आत्ता पुष्य नक्षत्र सुरु आहे अद्यापही अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा व हस्त ही नक्षत्रे शिल्लक आहेत. संप्टें अखेर ते ऑक्टोबर पाहिल्या आठवडया पर्यंत पाऊस पडणार. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान पूर्ण होईल"श्री.महेश हरीभाऊ जोशी , पंचाग अभ्यासक व ज्योतिषी, म्हसळा


إرسال تعليق