किरकोळ भांडणातुन कोयत्याने मारहाण : आरोपी अटकेत


संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील मदन सुंदर शिलकर वय ६० रा. गोंडघर याने आपला पुतण्या हरीचंद्र धोंडू शिलकर वय ३८ याला कोयत्याने मारल्याची घटना घडली. हरीचंद्र याचे चेहरा व खांद्याला जखमा झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगीतले. सदरची घटना सोम.दि. २९ रोजी सकाळी १०.१५ वा. गोंडघर येथे घडली. धोंडू सुंदर शिलकर वय६९ याने दिलेल्या फिर्यादी वरून दिघी सागरी पोलीसानी गुन्हा र. नं. १९/२०१९ भा.द.वि. सं. क.३२४ प्रमाणे गुन्हयाची नोंद केली असून आरोपी मदन यास पोलीसानी अटक केली आहे. जखमी हरीचंद्र याचेवर बोर्लीपंचतन येथील प्रा.आ. केंद्रात प्राथमिक उपचार करून सिव्हील हॉस्पीटल आलिबाग येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.हरीचंद्र धोंडू शिलकर ( पुतण्या) वय ३८ व आरोपी मदन (काका) असे काका पुतण्यांची संध्याकाळी गट्टी होत असे काका पुतण्याला दारु ही आणून देत असे, काकाकडे पुतण्या मुक्काम करीत असे . दारु मुळे दुसरे दिवशी भांडण होऊन काकाने रागाने आकडीतली कोयती काढून पुतण्याला मारण्याची घटना घडली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा