संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातून भरधाव जाणाऱ्या महीन्द्र पिकअपने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार सलीम शेख गुलाम वय ६० हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . महीन्द्र पिकअप नं MHO6BG 2953 ही दुधाचे रिकामे कंटेनर घेऊन म्हसळ्याहून माणगाव कडे जात होती तर दुचाकी स्वार सलीम शेख गुलाम हा MH 19 DK 7270 या अॅक्टीव्हाने पेट्रोलपंपावरून म्हसळा शहराकडे येत असता साने आळीपरीसरांत अपघात झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. पिकअप अरूंद रस्त्यावरून फार भरधाव जात असल्याने यामध्ये ६० वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी माणगाव व पुढे नवी मुंबई येथे पाठविल्याचे तपासी अमतदार आनंद राठोड यानी सांगितले

إرسال تعليق