संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शिवसेना रायगड जिल्हाध्यक्षपदी अखेर शिक्कामोर्तब झाला, माणगांव तालुका प्रमुख अनिल नवगणे यांची शिवसेना दक्षिण विभाग रायगड जिल्हा प्रमुखपदी आज अधिकृत घोषणा करण्यात आली. नवगणे यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हसळा तालुक्यातुन माजी सभापती महादेव पाटील, शहरप्रमुख अनिकेत पानसरे ,माजी उपतालुका प्रमुख सुरेश कुडेकर , शहर संघटक कल्पेश जैन, युवासेना उपशहर अधिकारी कौस्तुभ करडे आदी शिवसैनोकानी नवगणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
लोकसभा निवडणुकी नंतर जिल्हाप्रमुख मुंडे यानी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदावर नियुक्ती निश्चीत होणार हे निश्चित असताना कोण असणार जिल्हा प्रमुखपदीअशी चर्चा संपुर्ण श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदार संघात जोरात सुरू होती अनेक जण या शर्यतीत होते. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यानी अनिल नवगणे यांची शिवसेना दक्षिण विभाग रायगड जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करून शिवसेनेचे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघावर लक्ष आसल्याची जाणीव शिवसैनिकाना झाली आसल्याचे शिवसैनीकांच्या उत्साहात दिसत होतेश्रीवर्धन विधानसभा मतदार संघात कुणबी समाज मोठया प्रमाणात आहे. त्याचा राजकीय फायदा शिवसेनेला होणार आसल्याचा राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे. नवगणे हे वयाच्या २१व्या वर्षी सरपंच ,नंतर उप सभापती ,तालुकाप्रमुख व आता थेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

إرسال تعليق