संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
मागील दोन वर्षांत घरफोड्या व चोऱ्या अशा घटना घडल्या या प्रकरणात योग्य तो तपास व कारवाईची मागणी तसेच तालुक्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावे अशी मागणी म्हसळा तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे प्रमुख कृष्णा कोबनाक यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक कांबळे यांचे कडे केली या वेळी कोबनाक यांचे समवेत भारतीय जनता पार्टी म्हसळा तालुका अध्यक्ष व समन्वय समिती अध्यक्ष शैलेश कुमार पटेल, म्हसळा तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील, प्रकाश रायकर,महिला तालुका अध्यक्षा मिना टिंगरे,धनश्री मुंडे,प्रियंका शिंदे,अल्पसंख्याक सेल अघ्यक्ष समीर धनसे आदि मान्यवर उपस्थित होते.शहरातील वाहतुक कोंडी समस्येवर उपाय योजना होणे आवश्यक आहे असे सांगताना वाहतुक कोंडी व समस्ये मुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्था बिघडणे, हिंदू- मुस्लीम झगडे होणे- नोंदवीणे असे प्रकार होतात. या बाबतीत दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे.या कामी म्हसळा तालुका भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी पोलीस प्रशासनाला मदत करतात यापुढेही मदत करतील असे तुकाराम पाटील यानी सांगितले. भाजपचे कार्यकर्त्यांनी म्हसळा पोलीस ठाण्याचे नव्याने कार्यभार स्वीकारलले पोलीस निरीक्षक पी.एन.कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

إرسال تعليق