खरसई ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर



म्हसळा : खरसई ग्रामपंचायतीचे थेट सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक राज्य निवडून आयोगाने जाहीर केली आहे.

राज्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तारीख जाहीर

 राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्टला होणार मतदान  

 राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली माहिती, यामुळे निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता झाली लागू 

 1 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 

 जिल्हानिहाय संख्या:
ठाणे : 6 I रायगड : 9 I रत्नागिरी : 4 I सिंधुदुर्ग : 3 I नाशिक : 25 I धुळे : 1 I सातारा : 4 I सोलापूर : 1 I कोल्हापूर : 1 I उस्मानाबाद : 3 I अकोला : 2 I यवतमाळ : 1 I वर्धा : 5 I चंद्रपूर : 2

 निवडणूक कार्यक्रम :

● सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे दि. 9 ते 16 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारली जातील. (शासकीय सुट्टी वगळून)
● त्यांची छाननी 19 ऑगस्टला होईल. 
● नामनिर्देशनपत्रे दि. 21 ऑगस्टपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. 
● मतदान दि. 31 ऑगस्टला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा