वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार " प्रेसीडेंट पोलीस पदकाने" सन्मानित



संजय खांबेटे : म्हसळा  प्रतिनिधी 

ठाणे ग्रामिण पोलीस कार्यालयात कार्यरत असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार याना दिं.२५ रोजी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यपाल सि. विद्यासागर राव यांच्या हस्ते "प्रेसीडेंट पोलीस पदकाने" सन्मानित करण्यात आले.पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस,गृहराज्य मंत्री दीपक केसरकर ,रणजित पाटील यांची उपस्थिती होती.वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांची कल्याण,भिवंडी, पडघा, कसारा, बोईसर, श्रीवर्धन, म्हसळा, पनवेल,कुडाळ, वसई , नालासोपारा या पोलीस स्टेशनला सेवा झाली.स्थानिक परीस्थीतीचा परीपूर्ण अभ्यास करून गुन्हेगाराना कर्दनकाळ ठरणारे व सर्वसामान्यांसाठी काळजीवाहू अशी त्यांची सर्वत्र ख्याती आहे. म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये सन २००९ ते १३ या काळात त्यानी अतीशय उत्कृष्ट काम करताना स्थानिक नागरीकाना संवादातून शिस्त कशी असते याची जाणीव करून दिली. त्याना प्रेसीडेंट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो : राज्यपाल सि. विद्यासागर राव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार याना प्रेसीडेंट पोलीस पदक बहाल करताना.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा