म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची बदली


म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची कोकण भुवन,नवीमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांचाकडे विभागीय आयुक्त कार्यालय कोकणविभाग नवीमुंबई येथे रजा राखीव मुख्याधिकारी म्हणून पदभार देण्यात आलाआहे. म्हसळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर संपूर्ण शहराच्या विकासाची घडी बसवण्याचे काम गारवे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये
केले. 26 जून 2015 ला स्थापन झालेल्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये गारवे यांनी ऑगस्ट 2016 मध्ये म्हसळा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. नगरपंचायत नव्याने स्थापन झाली होती व ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांेनाच तेथे नियुक्ती दिल्याने नव्याने स्थापन झालेल्या म्हसळा
नगरपंचायतीचा कार्यभार चालवणे कठीण होते.मात्र गारवे यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर नगरपंचायत चालवून शहरात विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे काम केले. गारवे यांच्या कार्यकाळात अतिक्रमण हटाव
मोहीम व प्लॅस्टिक बंदीसाथी घेतलेले निर्णय गाजले असून नागरिकानी या निर्णयाचे स्वागत केले होते.नगराध्यक्षा फलकनाज हुर्झुक, उप नगराध्यक्ष संजय कर्णिक,बांधकाम सभापति नासिर दळवी,माजी नगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा
सभापति दिलीप कांबळे,लिपिक अशोक सुतार,संतोष कुडेकर,बाळू चाळके, सचिन मोरे व नगरपंचायत कर्मचारी यांनी मावळते मुख्याधिकारी वैभव गारवे यांना पुढील
वाटचालीसाठी शुभेछा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा