मुरबाडमध्ये गर्जा कट्ट्यावर सजली काव्य वाचन स्पर्धा


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
दि.२९, गर्जा कलामंच मुरबाडच्या वतीने मुरबाड तालुक्यात  दरमहा आयोजित केल्या जाणाऱ्या गर्जा कट्ट्याच्या चौथ्या भागात काव्य वाचन स्पर्धा मुरबाड येथे गर्जा स्टुडिओ मध्ये  रविवारी आयोजित करण्यात आली होती. कला क्षेत्रातील नवे व्यासपीठ म्हणून गर्जा कट्ट्याकडे पाहिले जात असताना,  दरवेळी नवनवे उपक्रम राबवून कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम गर्जा कलामंचाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात सुरु आहे.
              यावेळी आयोजित काव्य वाचन स्पर्धेचे उदघाटन श्री.जुगल जाखोटिया, संतोष गायकर, मंगल डोंगरे, शंकर करडे, अनंत घागस आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गर्जा कलामंचचे संस्थापक अध्यक्ष नितेश डोंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
        या उपक्रमास कविता प्रेमींनी भरभरून दाद  देऊन स्पर्धेत सहभाग नोंदविला.  राजेश साबळे , संतोष भांडे, रोशन देसले , राजेश काकडे , भूषण मोरे, सचिन थोरात, संदीप कापडी, प्रथमेश रोठे , गणेश शिंगोळे, महेश वालकोळी, दिपक शेळके, रविंद्र भांडे,  भाऊ पानसरे , अनंत केदार , विजय जाधव, रुपेश खाटेघरे, कुणाल घोलप , इ. कवींनी सहभाग नोंदविला तर या  स्पर्धेत  प्रथम क्रमांक योगेश साबळे , व्दितीय क्रमांक समीर खुटारे, तृतीय क्रमांक अजिंक्य डोंगरे व उतेजनार्थ रोहिदास भागवत, मयुरेश शिंदे , विष्णू खानजोडे  यांनी संपादन केले. 
             या वेळी कवींच्या   विविध विषयांवरील बहारदार आणि दर्जेदार  कविता उपस्थितांना  ऐकण्यास मिळाल्या. बाहेर जोरदार पाऊस पडत होता तर गर्जा कलमांच स्टुडिओ मध्ये कवितांचा पाऊस पडत होता.  या संपूर्ण काव्य वाचन  स्पर्धेचे परीक्षण  जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे व कोमसापचे मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण घागस  यांनी केले. तर दीपक आंबटकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा