बाबू शिर्के म्हसळा
विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणारा दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी इंटरनेटवरून जाहीर झाला. म्हसळा तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल 67.57% टक्के लागला असून यंदा निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात एकमेव नेवरूळ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हसळा तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला 856 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 587 विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. म्हसळा तालुक्यात खरसई शाळेचा भावेश हरी गाणेकर याने 88.60 % मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री मुलाने सर, काटे सर, सातपुते सर, शाळा व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष श्री देवजी खोत, सरपंच महादेव कांबळे, गाव अध्यक्ष पांडुरंग खोत, श्री निलेश मादांडकर, श्री भालचंद्र म्हसकर तसेच जेष्ठ कार्यकर्ते परशुराम मादांडकर,तुकाराम मांदाडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
إرسال تعليق