तालुक्याचा दहावीचा निकाल 67.57% ; दिव्यागत्वावर मात करत ऋषिकेश सुदामाने मिळवले 86.60 टक्के


म्हसळा (बाबू शिर्के)
विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणारा दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी इंटरनेटवरून जाहीर झाला. म्हसळा तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल 67.57% टक्के लागला असून यंदा निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात एकमेव नेवरूळ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हसळा  तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला 856 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 587 विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. म्हसळा तालुक्यात खरसई शाळेचा भावेश हरी गाणेकर याने 88.60 % मिळवून   प्रथम क्रमांक पटकावला स्नेहा किशोर बोरकर या न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा च्या विद्यार्थिनींनी 87.20 % मिळवून दुसरा क्रमांक तर त्याच विद्यालयाच्या माळी ऋषिकेश सुदाम याने 86.60% मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
म्हसळा शहरासह तालुक्यातील निकाल खालील पुढीलप्रमाणे सावित्री माध्यमिक विद्यालय आंबेत 86.66%, न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा 78.52%, अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कुल 56%, आयडील इंग्लिश स्कुल 83.69%, घोसाळकर विद्यालय खामगाव 76.92%, न्यू इंग्लिश स्कुल तळवडे 36.36%, आजाद हायस्कुल पंगलोली 58.33%,न्यू इंग्लिश स्कुल खरसई 65.21%, माध्यमिक स्कुल काळसुरी 61.90%, न्यू इंग्लिश स्कुल देवघर 53.33%, न्यू इंग्लिश स्कुल नेवरूळ 100%, न्यू इंग्लिश स्कुल पाभरे 67.16%, ए आय जंजिरा हायस्कुल गोंडघर 64.44%, माध्यमिक विद्यालय केलटे 73.33%, माध्यमिक विद्यालय पाष्टी 83.87%, माध्यमिक विद्यालय संदेरी 83.33% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा