संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
खासदार सुनील तटकरे यानी लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळविल्या नंतर आता विधानसभा निवडणुकीं कडे लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार संघातील आलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या सर्व विधानसभा मतदार संघाकडे ते जातीने लक्ष केंद्रीत करणार आसले तरी सर्वात जास्त म्हणजे ३८,२४७ मताधिक्य देणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. विधानसभा मतदार संघात किमान ५० हजाराचे मताधीक्क असणार अशी श्रीवर्धन- म्हसळा तालुक्यात नाक्या नाक्यावर कार्यकर्ते चर्चा करीत आहेत.
त्याच अनुषंगाने खासदार सुनील तटकरे रविवार दिनांक 9/06/२०19 रोजी म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते व मुस्लीम समाजाचे भारदस्त व्यक्तीमत्व असणारे जमीर नजीर यांचे भावाच्या विवाह सोहळयास शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील शिस्ते गावा तर्फे आयोजित सत्कार सोहळा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. नजीर यांच्या विवाह सोहळ्यास मतदार संघातील उपस्थित बहुतांश मुस्लीम मंडळीं व अन्य मंडळी खासदार तटकरे यांची भेट घेणार त्यातूनच सर्वांची मन व मत पक्की होणार हे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात किमान ५० हजाराचे मताधीक्क घेणार हे निश्चित आहे.
إرسال تعليق