तालुक्यातील 856 विध्यार्थ्यांपैकी केवळ 587 विध्यार्थी पास
न्यु इंग्लिश स्कूलची स्नेहा बोरकर 87.20 गुण मिळवुन शाळेत पहिली.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
इयत्ता 10वी(माध्यमिक शालांत )परीक्षा मार्च 2019 चा म्हसळा तालुक्याच्या निकालात या वर्षी घट झाली आसुन तो अवघा 68.58टक्के इतका लागला आहे. ह्या वर्षी म्हसळा तालुक्यातील 856 विध्यार्थी इयत्ता 10 वी च्या परीक्षेला बसले होते पैकी अवघे 587 विध्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील 20 शाळांंमध्ये फक्त एकाच (नेवरूळ) शाळेचा निकाल 100% लागला आहे.म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलचा निकाल 78.52% लागला आसुन या शाळेची कु.स्नेहा किशोर बोरकर हिने 87.20%गुण मिळवुन शाळेत पहिल्या क्रमांकाने पास झाली आहे.याच शाळेतील कुमार ऋषिकेश सुदाम माळी याने विकलांगतेवर मात करून 86.60 %गुण मिळवुन शाळेत दुसरा तर कुमारी मैथिली मिलिंद काते हिने 86.20% गुण प्राप्त करून शाळेत तिसरी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मध्ये पहिली आली आहे. शाळेत विराज जगजीवन लाड 81.80आणि कु.अतिक्षा अशोक काते हिने 80.80%गुण मिळवित मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
एक नजर तालुक्यातील शाळानिहाय निकालावर...
म्हसळा तालुक्यातील सावित्री माध्यमिक विद्यालय आंबेत शाळेचा निकाल 86.66%,
न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा 78.52%,
अंजुमन इ इस्लाम जंजिरा हायस्कूल म्हसळा 56%,
आयडियल इंग्लिश हायस्कूल म्हसळा 83.69%,
जी.एल. गोंडघर मा.विद्यालय 76.92%,
न्यु इंग्लिश स्कूल तळवडे 36.36%,
एम.ए.आझाद हायस्कूल पांगलोली 58.33%,
न्यु इंग्लिश स्कूल खरसई 65.21%,
माध्यमिक स्कूल खरसई,मेंदडी 61.90%,
न्यु इंग्लिश स्कूल देवघर 53.33%,
न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ 100%,
न्यु इंग्लिश स्कूल पाभरे 67.16% ,
मराठी माध्यमिक शाळा वरवठणे 59.09%,
मराठी माध्यमिक विद्यालय कोलवट 40%,
ए.आय.जंजिरा हायस्कूल गोंडघर 64.44%,
माद्यमिक विद्यालय केलटे 73.33%,
प्र.पाटील विद्यालय पाष्टी 83.87%,
प्र.पाटील विद्यालय संदेरी 83.33%,
राष्ट्रीय उर्दु माध्यमिक विद्यालय संदेरी 46.15% ,
मेंदडी हायस्कूल 38.46% इतका लागला आहे तालुक्यातील वरील विद्यालयातील एकुण 856 परीक्षार्थीं पैकी 587 परीक्षार्थी विध्यार्थी पास झाले आहेत .
إرسال تعليق