म्हसळा - पाभरे धरण दुरुस्तीचे काम आठवडा भरात पुर्ण होणार


म्हसळा - पाभरे धरण दुरुस्तीचे काम आठवडा भरात पुर्ण होणार,
● आमदार अनिकेत तटकरे यांनी धरणावर जाऊन केली पहाणी

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

 म्हसळा पाभरे धरणाचे जॅकवेल नादुरुस्त झाले असल्याने त्याचे दुरुस्तीचे काम शासनाचे लघु पाटबंधारे वीभागाने हाती घेतले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरण दुरुस्तीचे काम पुर्ण व्हावे यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी वर्गाला सोबत घेत प्रत्यक्ष पाभरे धरणावर जाऊन पहाणी केली असता माहे जुन 2019 च्या पहिल्या आठवड्यात धरण दुरुस्तीचे मुख्य काम पुर्ण होईल अशी माहिती बांधकाम उपअभियंता सचिन शिंदे यांनी देताना सांगितले. पाभरे धरणात पाणी साठवण क्षमता मोठी आहे. माहे जुन, जुलै महिन्यातच पावसाचे पाण्याने पाभरे धरण भरून वाहतो याचा अर्थ पाभरे धरण मातीचे गाळाने भरला असल्याचे प्रत्यक्ष दर्शी आमदार अनिकेत तटकरे यांनी संबंधीतांचे निदर्शनास आणुन देत धरणातील साचलेला मातीचा गाळ काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. पाभरे धरणाच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार होती म्हणुन संबंधित विभागाने पाभरे धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केले होते. याच वेळी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होऊन आचारसंहिता लागू झाल्याने धरण दुरुस्ती कामाला विलंब झाला होता. ऐन पाणी टंचाईचे काळात 7 ग्राम पंचायती मधील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाली आहे. टँकर मुक्त म्हसळा तालुका आता टँकरग्रस्त झाला आहे. पाभरे धरणाचे प्रत्यक्ष कामाला आता गती प्राप्त झाली असल्याने हे काम जुन महिन्याचे पहिल्या आठवड्यात होईल त्यामुळे खऱ्या अर्थाने पाणी टंचाई दुर होण्यास मदतीचे होणार असल्याचे माहिती अंती समजते.


  पाभरे धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता किती आहे असे लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता चिखलकर यांच्याकडे फोनवर संपर्क करून विचारले असता मी आता प्रवासात आहे एका तासाने सांगतो. याचा अर्थ संबंधीत अधिकारी वर्गाला धरणा बाबतीत माहिती किती आहे आणि त्याचे गांभीर्य काय आहे हे लक्षात येते. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा