निवडणुक निरीक्षक रवींद्र सिंग यांचा श्रीवर्धन दौरा ; गैर प्रकारांना पायबंद घालण्यासाठी योग्य कारवाई करा-रवींद्र सिंग



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे .प्रत्येकाने कटाक्षाने आपले नियत कर्तव्य पार पाडणे अगत्याचे आहे .कुठे ही गैर प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी .कोणता ही गैर प्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करावी .असे रविंद्र सिंग यांनी निवणुक अधिकारी वर्गास मार्गदर्शन करताना सांगितले .

श्रीवर्धन तालुक्यातील निवडणुक निरीक्षकांचा   एक दिवसीय  दौऱ्यात  सिंग यांनी जनजागृती वाहनाचे उद्घाटन केले .तसेच( EV M -V V PA T) सुरक्षा कक्षाची पाहणी केली .श्रीवर्धन मधील तीन मतदान केंद्रास भेट दिली .तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सिंग यांच्या हस्ते निवडणुक ओळखपत्राची वाटप करण्यात आली .
सिंग यांनी मतदार कार्यालय प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी यांना संबोधित करत असतांना विविध बाबींचे  मार्मिक मार्गदर्शन केले .निवडणुक कामा दरम्यान शिस्त व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे .तुम्ही केलेल्या योग्य कारवाईस निवडणूक आयोगा चे समर्थन असेल असे सिंग यांनी सांगितले .निवडणुक प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने वेळेवर आपल्या कार्यक्षेत्रात पोहचणे अगत्याचे आहे .आपण सर्वांनी एकत्र मिळुन काम केल्यास आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम आपण यशस्वी करू असे रवींद्र सिंग यांनी सांगितले.
क्षेत्रीय अधिकारी  व कार्यलय प्रमुखांना संबोधित करत असताना प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आपण केलेल्या कामाचा तपशील निवडणूक निरीक्षक सिंग यांच्या समोर सादर केला .व प्रत्येक घटकास आपले काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी  योग्य मार्गदर्शन केले .सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी केले .सदर च्या मार्गदर्शन शिबिरास तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .

दिव्यांग जनजागृती साठी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शालेय विदयार्थी वर्गाने पथनाट्य सादर केले .

 १९३ श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन ,तळा , म्हसळा ,माणगाव व  रोहा या तालुक्यंचा समावेश होतो

  सदरच्या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन ,तळा ,म्हसळा ,माणगाव व रोहा येथील उपविभागिय पोलिस अधिकारी , तहसीलदार , ग़टविकास अधिकारी , ग़ट शिक्षण अधिकरि , उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा