खरसई आरोग्य उपकेंद्र ठरतेय शोभेची इमारत


सुविधांची वानवा , रुग्णांची हेळसांड : तीन पदे मंजूर त्या पैकी दोन पदे रिक्त , एकाचा पत्ताच नाही 

म्हसळा : महेश पवार
तालुक्यात सर्वात मोठी वस्ती असलेल्या गाव खरसई अशी ओळख असताना त्या ठिकाणी हवी असणारी आरोग्य सेवा सर्वसामान्यांना मिळत नसल्याची खंत तेथील ग्रामस्थ करत आहेत. या विषयी सविस्तर वृत्त असे की म्हसळा तालुक्यातील खरसई गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवा देण्याचे तरतूद करण्याचे काम शासनाने केले आहे . त्यासाठी तेथील रुग्णांना सेवा देण्यासाठी ३ आरोग्य सेविका नियुक्ती त्या पैकी १ कर्मचारी कार्यरत आहे तर दोन पदे रिक्त आहेत . उपआरोग्य केंद्र अंतर्गत ७ गावे असून त्याची लोकसंख्या ३,०६० आहे . परंतु निकषाप्रमाणे पालथ्या घड्यावर पाणी कारण शासनाच्या निकषाप्रमाणे रुग्णांना सेवा देणे बंधनकारक असताना तशा प्रकारची सेवा दिली जात नाही . त्या ठिकाणी आरोग्य सेवा देणारी सेविका त्या गावी राहत नसल्याने तेथील रुग्णांची गळचेपीहोत आहे . उपकेंद्रामार्फत लसीकरण विविध प्रकारच्या आजाराच्या उपचार संबंधी सल्ले साथीच्या रोगांचे दक्षता अशा प्रकारची कामे या ठिकाणावरून केली जातात . परंतु शासनाच्या निकषाप्रमाणे तेथील आरोग्य कर्मचारी उपकेंद्राच्या वास्तव्याला राहणे गरजेचे असताना ते आजही राहत नाही. खरसई येथे काम करणारी आरोग्य सेविका म्हसळा येथे राहतात, याकडे तेथील स्थानिक पदाधिकारी दक्ष नागरिक यांच्याकडे पाहत देखील नाहीत, शासनाने लाखो रुपये खर्च करून भव्यदिव्य इमारत बांधली पण ही इमारत धुळखात पडली आहे. शासनाच्या सुविधा असून देखील रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन लाखो रुपये खर्च करावे लागतात. आरोग्य उपकेंद्रांचा उपयोग तरी कशासाठी शासनाने पाहणे अत्यंत गरजेचे आहे . 

आमच्या गावात या उपकेंद्रात मार्फत कोणतीच सेवा मिळत नाही . इमारत आहे परंतू तीचा वापर होत नाही, तीन आरोग्य कर्मचारी मंजूर असून त्या पैकी दोन रिक्त आहेत. एक कार्यरत आहे परंतु त्यांचा पत्ताच नाही. सर्व सामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळतच नाही, त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आपण सरपंच असताना अनेक वेळा पाठपुरावा केला परंतू आजही त्याठिकाणी सेवा मिळत नाही.
-माजी सरपंच निलेश मांदाडकर , खरसई . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा