संजय खांबेटे : म्हसळा
दि. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडीया ( स्थानिक व मुंबई शाखा ) आणि श्रावस्ती सम्यक संकल्प सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले, चक्रवर्ती सम्राट अशोक व विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२८ वा संयुक्त जयंती महोत्सव भरगच्च कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. कार्यक्रमांत आर्देशांचे प्रतिमेची पाभरे पूल ते आगरी समाज सभागृह रॅली, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, एस्.टी.स्टँड या कार्यालयांत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन, बुध्दवंदना व भिम गीतांचा कार्यक्रम , यावेळी डॉ . भगवान लोखंडे यांचे डॉ . बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक यांच्या विषयी व्याख्यान झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जाधव, सुदेश खैरे, सुभाष साळवे, सचिन जाधव, सुजाता जाधव, एन. के. जाधव, संतोष जाधव, बी.एस.मोरे, राजेंद्र मोहीते, अंकीत धोत्रे यानी विशेष मेहनत घेतली.

إرسال تعليق