श्रीवर्धन : भारत चोगले
एप्रिल महिना सुरू होताच दिवस वातावरणात अचानक बदल झाला असून कडक उन्हाचे चटके बसू लागल्याने श्रीवर्धन शहरात नागरिकांना रस्त्यावरुन फिरणे कठीण झाले आहे . सायंकाळी चार वाजेपर्यंत उष्म्यात अधिक वाढ होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत . श्रीवर्धन शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक दैनंदिन कामकाजासाठी श्रीवर्धन शहरामध्ये दररोज मोठ्या संख्येने येत असतात . परंतु सध्या दिवसेंदिवस वातावरणामध्ये उष्म्याचे प्रमाणात वाढ होत असल्याने रस्त्यावर होणारी वर्दळ फारच कमी प्रमाणात दिसत आहे . श्रीवर्धन तालुक्यातील काही भागातील रस्ते असे पडलेले दिसत आहेत . मार्च महिना संपताच कडक उन्हाने चांगलीच सुरूवात केली आहे . सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असली तरीही एकदा का सकाळी १० वाजण्यास सुरुवात झाली की , उन्हाचा उष्मा जाणवायला सुरूवात होत असतो . हिवाळा संपला असला तरीही कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली नव्हती . परंतु एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाने कहरच केला आहे . त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक सकाळच्या लवकर वेळमध्ये व संध्याकाळच्या उशिरा या वेळेमध्ये काम करण्यास पसंती करीत असतांना दिसत आहे . या कडक उन्हाच्या वातावरणामुळे नागरिकांच्या आजारामध्येसुध्दा वाढ झाली आहे . असाचा उन्हाचा जर का पारा काही दिवस कायम राहिला अथवा वाढ होत गेली तर जीवित हानी होण्यास नाकारू शकत नाही . होळी पोर्णिमेनंतर ख-याअर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते . दरवर्षी पहिल्या होळीपासून वातावरणातील तापमानात काही प्रमाणत बदल होण्यास सुरूवात होत असते . परंतु यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडक उनाला सुरूवात झाली आहे , चटके बसणारे उन असाह्य होत आहे . त्यामुळे अनेक नागरिकांचे पाय आपोआपच थंड पेयाच्या दुकांनाकडे वळत आहेत , उष्मातील वाढ कायम राहिल्यास यावर्षीचा उन्हाळा अधिक चटके देणारा ठरणार आहे . वातावरणातील उष्म्यात अचानक वाढ झाल्याने आंबा बागायतदार चांगलेच खूप झाले आहे . आंब्याला हे पोषक वातारण तयार झाल्याने आंब्याची वाढ लवकर होण्याची शक्यता आहे . उष्म्यातील वाढ कायम राहिल्यास आंबा पीक लवकर येईल असे बागायतदाराकडून सांगण्यात येत आहे . जर का उम्याचे प्रमाण वाढतच राहिले तर काही उष्मा सहन न झाल्यास नाकातून रक्त येणे , लघविला जळजळ होणे इत्यादी अनेक अजारात वाढ होण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही , तरी उष्म्याचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी जास्ती जास्त पाणी प्यावे , डोक्यावर टोपी अथवा छत्राचा वापर करावा , हलका आहार खावा , आवळा , कोकम , ऊसाच्या ज्यूसचा वापर जास्त करावा नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉ . अबू राऊत यांनी केले आहे .

إرسال تعليق