श्रीवर्धनमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत मरगळ


श्रीवर्धन : आनंद जोशी
सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या एकाच विषयाने देशभरातील वातावरण ढवळून निघाले असले तरी श्रीवर्धन तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये सध्या सामसूम आहे . राजकीय पक्षांमध्ये शांतता असन नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोप होताना दिसत नाहीत . त्यामुळे निवडणुकीपूर्वीची शांतताच श्रीवर्धन तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे . विविध राजकीय पक्षांच्या युत्या आघाड्या , राजकीय पक्षांचे एकमेकांवरील आरोप - प्रत्यारोप , निवडक भागांत मोठमोठ्या राजकीय पक्षाच्या होत असलेल्या प्रचार सभा , रोड शो , राजकीय पक्षांचे जाहीरनामे , निवडणुकांच्या काळात येणारी पक्षांतराची लाट आदी गोष्टींमुळे देशांत सध्या निवडणमय वातावरण तापलेले आहे . मात्र श्रीवर्धन तालुक्यात कार्यकत्त्यांमध्ये तितकासा उत्साह नसल्याचे चित्र आहे . निदान श्रीवर्धन तालुक्यात अद्याप फारसे निवडणुकीचे वातावरण तापलेले दिसत नाही . रायगड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - शे . का . प . आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचे कार्यकत्यांचे एक - दोन मेळावे श्रीवर्धन शहरांत झाले आणि शिवसेना - भाजपा युतीचे उमेदवार ना , अनंत गीते यांच्या तालुक्यातील ग्रामीण भागात २ एप्रिल रोजी रानवली व बोर्ली पंचतन भागांत निवडणूक प्रचार सभा झाल्या , या व्यतिरिक्त प्रचाराने अजूनही आघाडी घेतलेली नाही . श्रीवर्धन शहरांत मात्र कोणत्याही उमेदवाराची निवडणुकीची जाहीर प्रचार सभी अद्याप झालेली नाही , विविध राजकीय पक्षांचे शहरांतील पदाधिकारी , कार्यकर्तेही आपापल्या नेहमीच्या कामात व्यग्र दिसत आहेत , तर कोणी आपल्याला आमंत्रण नव्हते असेही सांगताना दिसत आहेत . या सर्व गोष्टींमुळे श्रीवर्धन शहरात कुठेही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही . सगळीकडे नेहमीची शांतता दिसून येत आहे . जणू कोणालाच निवडणुकीशी काही घेणे - देणे नाही , अशी स्थिती श्रीवर्धनमध्ये सुरू आहे . श्रीवर्धन तालुक्यात राजकीय वातावरण थंड आहे , जो काही जाहीर प्रचार होतोय ती ग्रामीण भागात आहे असे चित्र आहे . कदाचित शहरातील मतदारांबद्ल उमेदवारांना भरवसा वाटत नसावा असेही काही लोक विनोदाने बोलताना दिसत आहेत . एकूण काय तर श्रीवर्धन शहरात अद्याप कोणताही निवडणुकीचाउत्साह जाणवतदेखील नाही . मला काय त्याचे ? या वृत्तीचे प्रत्यंतर वरील वातावरणावरुन येत आहे . शासकीय यंत्रणा याला अपवाद आहे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न आहेत . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा