शिवसेनेचा खरा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस आहे - वरुण सरदेसाई


म्हसळा (बाबू शिर्के)
 महाराष्ट्रात शिवसेनेचा खरा शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस असून राष्ट्रवादी काँगेसची महाराष्ट्रातून ताकद संपवायची आहे.त्यासाठी मावळ मधून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणी रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा आगामी निवडणुकीत पराभव झाला पाहिजे त्यासाठी युवसैनिकांनी जोरदार कामाला लागले पहिजे असे प्रतिपादन युवासेना राष्ट्रीय सचिव वरुण सरनाईक यांनी महाड येथे झालेल्या रायगड लोकसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीत दिले. युवासैनिकांनी 18 ते 30 वयाचा मतदारांवर विशेष लक्ष घातले पाहिजे.जो मतदार यावेळी पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांला आपल्या युवसैनिकांनी शिवसेनेला मतदान करायला सांगा म्हणजे तो आयुष्यात कधीही दुसऱ्या पक्षाला मतदान करणार नाही असा विश्वास वरुण यांनी पुढे बोलताना व्यक्त केला.तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या खांद्याला खांदा लाऊन युवासैनिकांनी अनंत गीते यांना भरगोस मतांनी निवडून आणा असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.यावेळी दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले, शिवसेना स्टार प्रचारक चेतन नाईक- युवासेना विस्तारक, नगरसेवक नवी मुंबई महानगर पालीका,योगेश निमसे - युवासेना विस्तारक, सुधीर ढाणे - उत्तर रायगड जिल्हा अधिकारी, अजिंक्य मोरे- रत्नागिरी जिल्हा अधिकारी, अजित देशमुख,मुकेश पवार, अमित महामुनकर, आणी युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा