संजय खांबेटे : म्हसळा
३२-रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १६ उमेदवार असतील.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1. विलास गजानन सावंत ( महाराष्ट्र क्रांती सेना)
2. श्री संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी)
3. अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष)
4. गायकवाड अनिल बबन ( अपक्ष)
5. अशोक दाजी जंगले (अपक्ष)
6. रामदास दामोदर कदम (अपक्ष)
7. श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष)
8. सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी)
३२-रायगड लोकसभा मतदारसंघात अंतिमत: रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
1. श्री अनंत गंगाराम गीते (शिवसेना),
2. श्री तटकरे सुनील दत्तात्रय (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी),
3. नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी ),
4. सुमन भास्कर कोळी (वंचितबहुजन आघाडी ),
5. मिलिंद भागुराम साळवी ( बहुजन समाज पार्टी ),
6. मधुकर महादेव खामकर ( अपक्ष ),
7. संदीप पांडुरंग पार्टे ( बहुजन महा पार्टी) ,
8. तटकरे सुनील सखाराम (अपक्ष)
9. सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष),
10. घाग संजय अर्जुन( अपक्ष),
11. गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना),
12. प्रकाश सखाराम कळके,( भारतीय किसान पार्टी),
13. अविनाश वसंत पाटील, (अपक्ष),
14. तटकरे सुनील पांडुरंग ( अपक्ष),
15. योगेश दीपक कदम ( अपक्ष),
16. मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष)
मतदान मंगळवार २३ एप्रिल २०१९ रोजी असून मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे.
रुग्णवाहिका देखील उपलब्ध
नुकताच हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय केली आहे असे सांगून डॉ विजय सूर्यवंशी म्हणाले की,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका देखील नियुक्त करण्यात येतील. जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील याबाबतीत सुचना दिल्या असून वेळप्रसंगी वैद्यकीय सेवा दिली जाईल. १०८ रुग्णवाहिका देखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहज उपलब्ध होतील असे ते म्हणाले.
३२-रायगड लोकसभा मतदारसंघात ७७३६ दिव्यांग असून १२२० अंध(क्षीण दृष्टी) आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.
व्हील चेअर्सची सुविधा
एकंदर ६७३ व्हील चेअर्सची मागणी असून ३०० पेक्षा जास्त व्हील चेअर्स उपलब्ध झाल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

إرسال تعليق